Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेने गोसावीच्या मार्फत शाहरुख खानकडे मागितली २५ कोटींची खंडणी

Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेने गोसावीच्या मार्फत शाहरुख खानकडे मागितली २५ कोटींची खंडणी
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी सीबीआयने नवा खुलासा केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनचे माजी प्रमुख समीर वानखेडे आणि इतरांविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरमध्ये सीबीआयने म्हटले आहे की आर्यन खानच्या कुटुंबाकडून म्हणजे अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटी रुपये उकळण्याची योजना आखली होती. सीबीआयने सांगितले की आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावी आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न करत होता. (Aryan Khan Drugs Case)

चौकशीदरम्यान समीर वानखेडेकडून त्याच्या परदेश दौऱ्यांबाबत माहिती घेतली जात आहे, मात्र तो उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी के. पी. गोसावीला एनसीबीचा अधिकारी म्हणून आरोपींसमोर हजर केल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. गोसावीने आर्यन खानच्या कुटुंबियांकडून त्याला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी केली व १८ कोटी रुपयांची डील फायनल झाली होती. (Aryan Khan Drugs Case)

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील १७ संशयितांना सोडण्यात आल्याचेही तपासात उघड झाले असून त्यात एका ड्रग्ज विक्रेत्याचाही समावेश आहे. त्याच्याविरुद्ध कागदपत्रांची कोणतीही प्रक्रियाही करण्यात आलेली नाही. वानखेडेला त्याच्या परदेश दौरा आणि खर्चाची माहितीही देता आली नाही, असे तपासात पुढे आले आहे. याशिवाय, विभागाला न कळवता खासगी संस्थेला महागड्या घड्याळांची विक्री आणि खरेदी करण्यातही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. (Aryan Khan Drugs Case)

NCB ने केलेल्या कारवाईनुसार, एसईटी (विशेष तपास पथक) ने उघड केले की २ ऑक्टोबर २०२१ रोजी, कॉर्डेलिया छाप्याच्या दिवशी काही संशयितांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली होती. पहिल्या यादीत 'आय-नोट'मध्ये सुरुवातीला २७ नावे होती आणि नंतर १७ नावे काढून टाकण्यात आली आणि आय-नोटमध्ये फक्त १० नावे ठेवली गेली.

ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना के.पी. गोसावी याच्या खासगी वाहनातून एनसीबी कार्यालयात आणण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. यावरून असे दिसून येते की, आरोपींसमोर एनसीबी अधिकारी म्हणून गोसावीला दाखविण्यात आले. तसेच गोसावीला आरोपींसोबत राहू दिले होते. (Aryan Khan Drugs Case)

अशा प्रकारे के. पी. गोसावी आणि त्याचा साथीदार सानविल डिसोझा यांनी शाहरुख खानकडून २५ कोटी रुपये वसूल करण्याचा कट रचला. मात्र, नंतर १८ कोटी रुपयांत हा करार झाला आणि के.पी. गोसावी याने आगाऊ लाच म्हणून ५० लाख रुपये घेतले, परंतु या रकमेतील काही भाग त्यांना परत करण्यात आला.

अहवालात म्हटले आहे की, "वानखेडे यांनी के. पी. गोसावी आणि प्रभाकर साईल यांना ड्रग्ज प्रकरणातील आरोपींविरुद्धच्या कारवाईत स्वतंत्र साक्षीदार म्हणून घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच केसच्या सुनावणीदरम्यान के.पी. गोसावी यांना आरोपी हाताळण्याची परवानगी देण्याचे निर्देश व्ही. व्ही. सिंग यांना दिले. शिवाय, एनसीबीच्या अहवालात म्हटले आहे की, "वानखेडेने त्याच्या परदेश दौर्‍यांची योग्य माहिती दिली नाही. त्यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यांचे स्त्रोतही योग्यरित्या घोषित केलेले नाहीत. वानखेडे हा विरल राजन या खासगी संस्थेसोबत महागड्या घड्याळांच्या विक्री आणि खरेदीमध्ये विभागाला न सांगता गुंतल्याचेही आढळून आले आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news