Varanasi expressway : दिल्ली ते कोलकाता प्रवास आता १७ तासात होणार पूर्ण; जाणून घ्या कसा आहे वाराणसी एक्सप्रेसवे | पुढारी

Varanasi expressway : दिल्ली ते कोलकाता प्रवास आता १७ तासात होणार पूर्ण; जाणून घ्या कसा आहे वाराणसी एक्सप्रेसवे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राजधानी दिल्ली ते पश्चिम बंगाची राजधानी कोलकाता या दरम्यानचा प्रवास आता आणखी रोमांचक होणार आहे. सगळं काही ठिक आणि वेळेवर पूर्ण झाले तर ‘वाराणसी एक्सप्रेसवे’ च्या माध्यमातून दिल्ली ते कोलकाता हा प्रवास केवळ १७ तासात पूर्ण करता येणार आहे. तर वाराणसी ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या माध्यमातून वाराणसी ते कोलकाता हे अंतर केवळ १० तासातच पूर्ण केले जाईल. (Varanasi expressway)

दिल्ली ते वाराणसी या प्रवासचा विचार केला तर पुर्वांचल, लखनौ-आग्रा आणि यमुना एक्सप्रसवेच्या माध्यामातून हा प्रवास या आधीच १० तासांचा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वाराणसी ते कोलकाता हा एक्सप्रेसवेचा संपूर्ण प्रोजेक्ट ३ हजार कोटी रुपयांचा आहे. २०२६ पर्यंत हा प्रोजेक्ट पुर्णत्वास आणला जाईल. वाराणसी – कोलकाता एक्सप्रेसवेच्या माध्यमातून ६९० किलोमीटरचे अंतर कमी होऊन ६१० किमी होईल आणि प्रवासाचे तास ६-७ तास पर्यंत कमी होईल. (Varanasi expressway)

केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव यांच्या मार्गदर्शनाखालील बैठकीत या प्रस्तावित एक्सप्रेसवेला २०२१ सालात मंजूरी मिळाली होती. या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून मोहनिया, रोहतास, सासाराम, औरंगाबाद, गया, चतरा, हजारीबाग, रांची, बोकारो, धनबाद, रामगड, हावडा आणि इतर महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. हा एक्सप्रेस वे वाराणसीच्या रिंगरोड पासून सुरु होईल आणि हावडा जिल्ह्यातील एनएच १६ ला जावून मिळेल.

अधिक वाचा :

Back to top button