Kerala Mob Lynching : धक्कादायक; केरळमध्ये मॉब लिंचिंग! चोरीच्या संशयावरुन बिहारच्या तरुणाची हत्या

तिरुअंनतपुरम; पुढारी ऑनलाईन : केरळमध्ये मॉब लिंचिंगची घटना समोर आली आहे. केरळ पोलिसांनी चोरीच्या संशयावरुन बिहारच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात रविवारी ९ लोकांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, राजेश मांझी (वय ३६) या तरुणाला स्थानिक लोकांनी जबर मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला. कोंडोट्टी येथे एका घराजवळ त्या व्यक्तीस व्यक्तीस पकडण्यात आले होते. (Kerala Mob Lynching)
मालप्पुरम जिल्ह्याचे पोलिस प्रमुख सुजीत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंडोट्टी जवळील एका घराजवळ राजेश याला चोर समजून स्थानिक लोकांनी पकडले. त्यानंतर त्याला बांधून घालून प्लास्टीकच्या पाईप व लाकडी दांड्याने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा बनविण्यात आला. यानंतर मारहाणीत तो बेशुद्ध पडला. या मारहाणी नंतर राजेश बेशुद्ध पडला. मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी स्थानिक समाजसेवकाला याची माहिती दिली. त्याने या घटनेबाबत पोलिसांना कळवले. (Kerala Mob Lynching)
घटनेची माहिती मिळताच पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहचले व राजेशला रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मारेकऱ्यांनी घटनास्थळावरुन पुरावे मिटविण्याचा प्रयत्न केला तसेच आजुबाजूचे सीसीटिव्ही फुटेजसुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच हे सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. (Kerala Mob Lynching)
पोलिस प्रमुख सुजीत दास यांनी सांगितले की, घटनास्थळावरुन ९ लोकांना अटक करण्यात आली आहे. कोंडोट्टी उपनिरीक्षकांकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर शव नातेवाईकांकडे सोपविण्यात आलीची माहिती पोलिसांनी दिली.
अधिक वाचा :