Turkey Election : तुर्कीत एर्दोगन यांची दोन दशकांची सत्ता संपुष्टात येणार? निवडणुकीत मोठे आव्हान | पुढारी

Turkey Election : तुर्कीत एर्दोगन यांची दोन दशकांची सत्ता संपुष्टात येणार? निवडणुकीत मोठे आव्हान

पुढारी ऑनलाइन डेस्क : Turkey Election : तुर्कीत आज राष्ट्रपती पदासाठी मतदान होत आहे. तुर्कीत गेल्या दोन दशकांपासून राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत एर्दोगन यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. एर्दोगन यांची कारकीर्द अनेक घडामोडींनी भरलेली आहे. तुर्कीत दोन दशकांनंतर यावेळी सत्ता परिवर्तन होणार की नाही. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.

Turkey Election : काय सांगत आहेत तुर्कीचे सर्वे

तुर्कीत एर्दोगन यांना मुख्य आव्हान विरोधी पक्षाचे उमेदवार केमल किलिकदारोग्लू यांचे आहे. किलिकदारोग्लू यांनी एर्दोगन यांना कडवे आव्हान देऊन जोरदार प्रचार केले आहे. निवडणूकपूर्व सर्वेनुसार केमल हे एर्दोगन यांना मागे टाकतील, असे चित्र आहे. या निवडणुकीत जर कोणत्याही उमेदवाराला 50 टक्क्यापेक्षा कमी मतदान मिळाले तर 28 मे रोजी रन ऑफ होईल.

Turkey Election : भूकंपानंतरच्या परिस्थितीमुळे एर्दोगन यांच्यासमोर मोठे आव्हान

तुर्कीमध्ये 6 फेब्रुवारीला झालेल्या तीव्र भूकंपात जवळपास 50,000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र, वेगवेगळ्या अहवालांनुसार, भूकंपात झालेली हानी नैसर्गिक आपत्तीपेक्षा निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे झाली असल्याचे मत आहे. तसेच भूकंप झालेला भाग हा एर्दोगन यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे विरोधकांनी एर्दोगन यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातूनच मोठे आव्हान उभे केले आहे.

Turkey Election : एर्दोगन यांनी विरोधकांना घेरले

एकीकडे विरोधी उमेदवार केमल यांनी एर्दोगन यांच्यासाठी मोठे आव्हान उभे केले आहे तर दुसरीकडे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एर्दोगन यांनी विरोधकांना चांगलेच घेरले आहे. एर्दोगन यांनी विरोधकांवर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडन यांच्या सोबत मिळून काम करत आहे. तसेच त्यांनी पश्चिमी देशांकडून जसे आदेश मिळत आहेत तसे ते वागत असल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. तसेच जर केमल किंवा अन्य कोणत्याही विरोधी पक्षाचे सरकार आल्यास ते पश्चिमी देशांसमोर त्यांच्या इच्छेनुसार झुकतील, असा आरोप करत त्यांनी विरोधकांना घेरले.

Turkey Election : कडवी लढत होऊ शकते

एर्दोगान, मुख्य विरोधी पक्षाचे उमेदवार केमाल किलिचदारोग्लू आणि रिपब्लिकन पीपल्स पार्टी आणि सिक्स पार्टी नेशन युतीचे उमेदवार यांच्यात अध्यक्षपदाच्या शर्यतीत कडवी लढत होण्याची शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे.

एर्दोगान आणि किलिकदारोग्लू यांच्या व्यतिरिक्त, उजव्या विचारसरणीचे एंसेस्ट्रल अलाइंस आघाडीचे उमेदवार सिनान ओगान हे देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. Ince, मध्यवर्ती होमलँड उमेदवार, त्याच्या विरुद्ध निंदा मोहिमेनंतर शर्यतीतून बाहेर काढले असल्याचे सांगितले. त्याला तुर्की सोशल मीडियावर अनेक आठवडे खोट्या आरोपांचा सामना करावा लागला. 2018 साली त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत भाग घेतला होता पण एर्दोगनच्या हातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

हे ही वाचा :

Russia Ukraine War : तुर्कीच्या शिखर परिषदेत युक्रेनच्या खासदाराने रशियाच्या खासदाराचे फोडले थोबाड

ISIS चा म्होरक्या ‘अबू हुसैन अल कुरैशी’चा खात्मा; तुर्कीचा दावा, सीरियात घुसून केले ‘काम तमाम’

Back to top button