Kottarakara Murder : पोलिसांसमोर आरोपी रुग्णाने केली डॉक्टर युवतीची हत्या; शासकीय रुग्णालयातील थरार

Kottarakara Murder : पोलिसांसमोर आरोपी रुग्णाने केली डॉक्टर युवतीची हत्या; शासकीय रुग्णालयातील थरार
Published on
Updated on

तिरुअनंतपूरम; वृत्तसंस्था : केरळमधील कोट्टारक्कारा (जि. कोल्लम) येथील एका शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णानेच डॉक्टर युवतीची (डॉ. वनदा मेनन) हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. डॉक्टर युवती रुग्णाला ड्रेसिंग करत असताना रुग्णाने तिच्यावर अचानक चाकूने वार केले. (Kottarakara Murder)

कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या या आरोपीला पोलिसांनी रुग्णालयात आणले होते. डॉक्टर युवती आरोपीच्या पायाच्या जखमेवर ड्रेसिंग करत होती. आरोपी अचानक हिंसक बनला आणि त्याने डॉक्टरसह तिथे हजर लोकांवर चाकू आणि कैचीने हल्ला केला. डॉक्टर युवतीला गंभीर जखमी अवस्थेत तिरुअनंतपूरम येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले, पण ती मृत पावली. आरोपी रुग्णाच्या हल्ल्यात काही पोलिस कर्मचारीही जखमी झाले. आरोपीने मद्यपान केलेले होते. पोलिसांनी त्याला कसेबसे पूर्ववत ताब्यात घेतले. (Kottarakara Murder)

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन (Kottarakara Murder)

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान तसेच मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी यांनी मृत डॉ. मेनन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

आरोपी निलंबित शिक्षक

डॉक्टर युवतीची हत्या करणार्‍या आरोपीचे नाव संदीप असून, तो एक निलंबित शिक्षक आहे.

काय कामाचे पोलिस? हायकोर्टाचा सवाल

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवन चामचंद्रन आणि न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी महिला आणि मुलांची सुरक्षा करण्यात पोलिसांनी तत्पर असायलाच हवे, पण केरळ पोलिस एका युवा महिला डॉक्टरची सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आहेत. जास्त संख्येने असलेल्या पोलिसांदेखत एकट्या व मद्यपान केलेल्या आरोपीने या युवतीची हत्या केली आणि हे पोलिस काहीच करू शकले नाहीत. हे सगळे पोलिस काय उपयोगाचे आहेत, असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला उद्देशून केला आहे.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news