Karnataka Election Exit Poll 2023 : कर्नाटकात काँग्रेस! जाणून घ्या एक्झिट पोल… | पुढारी

Karnataka Election Exit Poll 2023 : कर्नाटकात काँग्रेस! जाणून घ्या एक्झिट पोल...

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघासाठी आज, बुधवारी (दि.१०) मतदान पार पडले. मतदानावेळी मतदारांच्यात मोठा उत्साह पहायला मिळाला. मतदान पार पडताच एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली. निवडणूक पूर्व घेण्यात आलेल्या व्होटर सर्वे नुसार अनेकांनी काँग्रेसला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविला होता. काहीसा तोच अंदाज समोर येत आहे. कर्नाटकात एक्झिट पोलनुसार काँग्रेस बहुमतासाठी आघाडी घेईल असे वर्तवले जात आहे. नेमकी परिस्थिती काय? काय म्हणतात एक्झिट पोल जाणून घ्या सविस्तर आकडेवारी…(Karnataka Election Exit Poll 2023)

एक्झिट पोलचे आकडेवारी येण्यास सुरु झाली आहे. सध्या हाती येणाऱ्या आकडेवारीनुसार काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे आकडेवारीनुसार दिसत आहे. पी मार्क रिपब्लीक एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसला ९४ ते १०८, भाजपला ८५ ते १०० तर जेडीएसला २४ ते ३२ आणि इतर २ ते ६ जागा मिळतील असे सांगितले आहे. (Karnataka Election Exit Poll 2023)

मॅर्टिझ (Matrize)च्या एक्झिट पोलने काँग्रेसला १०३ ते ११८ जागा दिल्या आहेत. भाजपला ७९ ते ९४ जागा मिळतील असे सांगितले. तर जेडीएसला २५ – ३३ ते जागा आणि इतरला २ ते ५ जागा मिळतील असा अंदाज दिला आहे.

जन की बात या एक्झिट पोल नुसार भाजपला ९४ ते ११७ जागा मिळतील असा अंदाज दिला आहे. काँग्रेसला ९१ ते १०६ जागा मिळतील असे सांगितले आहे. तर जेडीएसला १४ ते २४ आणि इतर २ जागा मिळेल असा अंदाज दिला आहे.

  • मॅर्टिझ (Matrize)
BJP         79 – 94
CONG    103-118
JDS         25-33
OTH        2-5
  • पी मार्क रिपब्लीक (PMARQ)
BJP          85-100
CONG     94-108
JDS         24-32
OTH        2-6
  • सी वोटर
BJP         83-95
CONG    100-112
JDS         21-29
OTH        2-6
  • जन की बात
BJP        94 -117
CONG    91-106
JDS         14-24
OTH           0-2
  • ABP C-VOTER EXIT POLL
BJP       83-95
INC      100-112
JDS       21-29
OTH     2-6
  • NEWS NATION-CGS
BJP       114
INC       86
JDS       21
  • Polstrat
BJP        88-98
CONG   94-108
JDS       21-26
  • TIMES NOW-ETG

BJP       85
INC     113
JDS       23
OTH     03

  • SUVARNA NEWS-JAN KI BAAT

BJP      94-117
INC     91-106
JDS     14-24


अधिक वाचा :

Back to top button