Crypto Market News | बिटकॉइनला तगडा झटका, Binance च्या अ‍ॅक्शननंतर क्रिप्टोकरन्सी घसरली, जाणून घ्या कारण

Crypto Market News | बिटकॉइनला तगडा झटका, Binance च्या अ‍ॅक्शननंतर क्रिप्टोकरन्सी घसरली, जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाईन : मार्केट कॅपनुसार जगातील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) बिटकॉइन (bitcoin) ला तगडा झटका बसला आहे. जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज Binance ने मोठ्या प्रमाणात प्रलंबित व्यवहारांचे कारण देत एका दिवसात दुसऱ्यांदा अनेक तास बिटकॉइन काढण्यास बंदी घातली होती. (Crypto Market News) काहीवेळानंतर बायनन्सने बिटकॉइन काढण्याचे व्यवहार पुन्हा सुरु केले.

रविवारी उशिरा आणि पुन्हा सोमवारी पहाटे जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजने बिटकॉइन करन्सी काढणे बंद केले होते. क्रिप्टोकरन्सी काढण्याच्या सध्याच्या निर्बंधामुळे बिटकॉइन करन्सी सुमारे १ टक्के घसरून २८,१६२ डॉलरवर आली. एका आठवड्यातील ही निच्चांकी पातळी आहे. गेल्या २४ तासांत बिटकॉइनमध्ये २.२७ टक्के घसरण झाली आहे. तर आठवडाभरात बिटकॉइन करन्सी १.३० टक्क्यांनी कमकुवत झाली आहे. Binance च्या प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक समस्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. मार्चमध्ये तांत्रिक समस्यांमुळे त्यांनी ठेवी आणि करन्सी काढणे निलंबित केले होते.

Binance ने यांची माहिती ट्विट करत दिली होती. Binance एक्सचेंजने याआधी सुमारे एक तासासाठी पैसे काढणे थांबवले होते. त्यांची टीम एका निराकरणावर काम करत आहे आणि शक्य तितक्या लवकर बिटकॉइन काढणे पुन्हा सुरु होईल, असे Binance ने ट्विटमध्ये म्हटले होते.

Binance ने म्हटले होते की, "आम्ही #BTC काढणे तात्पुरते बंद केले आहे. कारण त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रलंबित व्यवहार आहेत. आमची टीम सध्या एका गोष्टीवर काम करत आहे आणि शक्य तितक्या लवकर bitcoin काढणे पुन्हा सुरु होईल." (bitcoin news) त्यानुसार बिटकॉइन काढणे पुन्हा सुरु झाले आहे.

Binance ने अद्याप बिटकॉइन काढण्याबद्दल कोणतीही अतिरिक्त माहिती जारी केलेली नाही. क्रिप्टो मार्केटला आव्हाने आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागत असल्याने गुंतवणूकदारांना डिजिटल मालमत्तांमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. (Crypto Market News)

 हे ही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news