अरविंद केजरीवालांच्‍या सरकारी बंगल्‍यावर १७१ कोटी खर्च : अजय माकन यांचा मोठा आरोप | पुढारी

अरविंद केजरीवालांच्‍या सरकारी बंगल्‍यावर १७१ कोटी खर्च : अजय माकन यांचा मोठा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांच्‍या सरकारी बंगल्‍याच्‍या सुशोभिकरणासाठी ४५ कोटी नव्‍हे, १७१ कोटी रुपये खर्च करण्‍यात आला आहे, असा आरोप आज काँग्रेस नेते अजय माकन ( Ajay Maken ) यांनी केला.

माध्‍यमांशी बोलताना अजय माकन म्‍हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्‍या सरकारी निवासाचा विस्तार करण्यासाठी दिल्‍ली सरकारला अधिकाऱ्यांची घरे पाडवी लागली. तसेच त्यांच्यासाठी अतिरिक्त सदनिका खरेदी कराव्या लागल्या आहेत. कोरोना काळात दिल्लीतील जनतेचे १७१ कोटी रुपये हे केजरीवालांच्‍या बंगल्‍याच्‍या सुशोभिकरणासाठी खर्च करण्यात आले आहेत. ( Kejriwal official bungalow renovation )

कोरोना काळात दिल्लीतील लोक ऑक्सिजनसाठी तळमळत होते, हॉस्पिटल आणि बेडसाठी तळमळत होते. जेव्हा गरीब माणूस अन्नासाठी तडफडत होता, त्‍या काळात केजरीवालांच्‍या बंगल्‍यासाठी सरकारी तिजोरीतून १७१ कोटी रुपये खर्च करण्‍यात आले, असा आराेपही त्‍यांनी केला.  ( Kejriwal official bungalow renovation )

केजरीवालांचे सरकारी निवास असणार्‍या संकुलात २२ अधिका-यांचे फ्लॅट आहेत, जे पाडून ते रिकामे करण्यात आले आहेत. त्याची भरपाई करण्यासाठी सरकारने राष्ट्रकुल क्रीडा गावात १२६ कोटी रुपयांचे २१ टाइप-५ फ्लॅट्स खरेदी केले आहेत, असेही माकन यांनी सांगितले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button