

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधी हनुमानगड जिल्ह्यात आज ( दि. ८ ) मिग-21 लढाऊ विमान एका घरावर कोसळले, तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दाेन महिलांचा समावेश आहे. पायलट सुखरूप असल्याची माहिती 'एएनआय'ने दिली आहे.
भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील सुरतगड येथून मिग-21 लढाऊ विमानाने उड्डाण केले होते. हनुमानगड जिल्ह्यातील बहलोल गावातील एका घरावर आज सकाळी ते कोसळले. या अपघातात तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. विमानाचा पायलट सुखरूप बाहेर पडला. विमानाने टेकऑफ झाल्यानंतर लगेचच तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाने सांगितले.
भारतीय वायुसेनेच्या ट्विटर हँडलवरून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, हनुमानगढ परिसरात आज सकाळी लढाऊ विमान कोसळले. प्रशिक्षणासाठी मिग-21 चा वापर केला जात असताना ही दुर्घटना घडली. सुरतगड येथून नियमित प्रशिक्षणासाठी आज सकाळी विमानाने उड्डाण केले होते. मिग-21 ज्या भागात पडले त्या परिसरातील चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
.
हेही वाचा :