Karnataka Election : विहिंप, बजरंग दलाकडून मंगळवारी देशभर ‘हनुमान चालिसा’चे आयोजन; काँग्रेसला प्रत्युत्तर | पुढारी

Karnataka Election : विहिंप, बजरंग दलाकडून मंगळवारी देशभर 'हनुमान चालिसा'चे आयोजन; काँग्रेसला प्रत्युत्तर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या ‘पीएफआय’सोबत बजरंग दलाची तुलना करणे सहन केले जाणार नाही, असे सांगत विश्व हिंदू परिषद आणि तिची युवा संघटना बजरंग दलाकडून मंगळवारी (दि.९)  देशभर हनुमान चालिसा पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी हे आयोजन होत आहे, हे विशेष. (Karnataka Election)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जारी केलेल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घातली जाईल, असे सांगण्यात आले आहे. यावरून राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार टीका चालविलेली आहे. (Karnataka Election)

बजरंग दलावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसला तसेच दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांना सद्बुद्धी यावी, यासाठी देशभर हनुमान चालिसा पाठाचे आयोजन करण्यात आले आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी सांगितले. प्रमुख मंदिरे आणि महत्त्वाच्या ठिकाणी हनुमान चालिसा पाठ केला जाईल. परांडे म्हणाले की, ‘बजरंग दल देशभर गाईंच्या रक्षणाचे काम करत आहे. याशिवाय सांस्कृतिक जागरण, गरीब घरातील मुलींचा मोफत विवाह व अन्य सामाजिक उपक्रम राबवित आहे. असे असूनही जर बजरंग दलाची तुलना ‘पीएफआय’सोबत केली जात असेल तर काँग्रेसचा उद्देश चांगला नसल्याचे स्पष्ट होत आहे.’

हेही वाचा;

Back to top button