रोजगाराच्या मोठ्या संधी! Air India मध्ये १ हजारहून अधिक जागांसाठी भरती, जाणून घ्या अधिक

पुढारी ऑनलाईन : टाटा समूहाच्या (Tata Group) मालकीची विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया (Air India) १ हजारहून अधिक वैमानिकांची भरती करणार आहे. त्यात कॅप्टन्स आणि ट्रेनर्सचा समावेश असेल. एअर इंडिया एअरलाइन विमानांचा ताफा आणि नेटवर्क वाढवणार असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. सध्या १,८०० पेक्षा जास्त वैमानिक असलेल्या या एअरलाइनने बोईंग आणि एअरबसकडे ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे, ज्यात वाइड-बॉडी विमानांचा समावेश आहे.
टाटा समुहाने गेल्यावर्षी जानेवारी २०२२ मध्ये एअर इंडिया ताब्यात घेतले होते. एका जाहिरातीनुसार, एअर इंडिया १ हजारहून अधिक वैमानिकांची भरती करत आहे. “आम्ही आमच्या A320, B777, B787 आणि B737 या विमानांच्या ताफ्यात कॅप्टन्स आणि फर्स्ट ऑफिसर तसेच ट्रेनर्संना अनेक संधी उपलब्ध करुन देत आहोत,” असे त्यात म्हटले आहे. एअर इंडियाच्या ताफ्यात ५०० हून अधिक विमाने सामील होत आहेत.
दरम्यान, एअर इंडियाच्या वैमानिकांनी त्यांच्या पगाराची रचना आणि सेवा शर्तींमध्ये सुधारणा करण्याच्या एअरलाइनच्या नवीन निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एअर इंडियाने त्यांचे वैमानिक आणि केबिन क्रूसाठी सुधारित नुकसान भरपाई स्ट्रक्चर पुढे आणले होते. पण इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन (ICPA) आणि इंडियन पायलट्स गिल्ड (IPG) या दोन पायलट युनियननी त्याला विरोध करत ते नाकारले. कर्मचाऱ्यांबाबत कोणताही निर्णय घेताना कंपनी पायलट संघटनांशी सल्लामसलत करत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
टाटा समूहाच्या चार एअरलाईन्स आहेत. त्यात एअर इंडिया (Air India), एअर इंडिया एक्सप्रेस, एआयएक्स कनेक्ट आणि विस्तारा यांचा समावेश आहे. आता टाटा समूह एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एआयएक्स कनेक्ट तसेच विस्तारा एअर इंडियामध्ये विलीन करण्याच्या प्रक्रियेत आहे.
#AirIndia will hire more than 1,000 pilots, including captains and trainers, as the #TataGroup-owned airline aims to expand its fleet and network. https://t.co/42aMLvmAah
— BQ Prime (@bqprime) April 27, 2023
हे ही वाचा :