Rejected Mercy Plea : चारवर्षीय मुलीवर अत्याचार व हत्या करणाऱ्या गुन्हेगाराची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली | पुढारी

Rejected Mercy Plea : चारवर्षीय मुलीवर अत्याचार व हत्या करणाऱ्या गुन्हेगाराची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : चारवर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाची दयायाचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी फेटाळून लावली आहे. 2008 साली नागपूरमध्ये वसंत दुपारे नावाच्या इसमाने लहान मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. (Rejected Mercy Plea)

दुपारे याने फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र 3 मे 2017 रोजी न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली होती. या प्रकरणासंदर्भात गेल्या मार्च महिन्यात गृह मंत्रालयाकडून राष्ट्रपती सचिवालयाला शिफारशीचे पत्र प्राप्त झाले होते. पण गुन्हेगाराला दया दाखविण्यास राष्ट्रपतींनी नकार दिला आहे. (Rejected Mercy Plea)

गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने दुपारे याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेवर 26 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते.

अधिक वाचा :

Back to top button