छत्तीसगड : ट्रक पिकअप व्हॅनची धडक ११ ठार, अनेक जण जखमी | पुढारी

छत्तीसगड : ट्रक पिकअप व्हॅनची धडक ११ ठार, अनेक जण जखमी

पुढरी ऑनलाइन : छत्तीसगड (Chhattisgarh ) येथे बालोदा बाजार जिल्ह्यात रात्री पिकअप आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात 11 जण जागीच ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले. सर्वच जण पीडित एकाच कुटुंबातील होते. गुरुवारी रात्री उशिरा एका कौटुंबिक कार्यक्रमातून परत येताना हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, याबाबत नागरिकांनी पोलीस माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्‍थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले तर काहींना पुढील उपचारासाठी रायपूरला पाठवण्यात आले.

दरम्‍यान दुसर्‍या घटनेत, रुदौली कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीत गुरुवारी एका पिकअप ट्रकने मोटारसायकल चालवणाऱ्या सेल्समनला धडक दिली. आणि त्याखाली चिरडून दोन महिला, एक लहान मूल आणि दुचाकीस्वार यांचा मृत्यू झाला. एक किलोमीटर अंतरावर ते जात असलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन सरकारी डॉक्टर गंभीर जखमी झाले. पोलिसांनी अपघातासंदर्भात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

-हेही वाचा 

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती सुरू

Puri Jagannath Temple : जगन्नाथ मंदिरातून दीडशे किलो सोने, अडीचशे किलो चांदी गायब?

कोल्हापूर : शाहूवाडीत प्रक्रिया उद्योगांची वानवा; डोंगरची मैना, मसाले पदार्थांना जगभर पोहोचविण्याची संधी

 

Back to top button