बिअंत सिंग हत्याकांडातील आरोपीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही

सर्वोच्‍च न्‍यायालय (संग्रहित छायाचित्र )
सर्वोच्‍च न्‍यायालय (संग्रहित छायाचित्र )

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बिअंत सिंग यांच्या हत्या प्रकरणी ( Beant Singh Assassination Case ) फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला आरोपी बलवंतसिंग राजोआना याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने हा निर्णय  दिला. बलवंतसिंग राजोआना याच्या दया याचिकेवर संबंधित खात्याने म्हणजे गृह मंत्रालयाने निर्णय घ्यावा, असे निर्देशही खंडपीठाने  दिले.

बिअंत सिंग यांच्या हत्येतील सहभाग सिध्द झाल्यानंतर 1995 साली राजोआना याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मागील 27 वर्षांपासून तो कारागृहात आहे. ( Beant Singh Assassination Case )

२०१२ साली राजोआना याने सरकारकडे दया याचिका दाखल केली होती. मात्र दीर्घकाळापासून ही याचिका केंद्र सरकारसमोर प्रलंबित आहे. गुन्हेगाराला दीर्घकाळ तुरुंगात ठेवणे हे त्याच्या मुलभूत हक्काचे उल्लंघन आहे. यामुळे न्यायालयाने हस्तक्षेप करीत त्याला दिलासा द्यावा व फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करावी, असा युक्तिवाद राजोआना याची बाजू मांडणाऱ्या ऍड मुकूल रोहतगी यांनी केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news