शरद पवार यांच्या आत्मचरित्रावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले… | पुढारी

शरद पवार यांच्या आत्मचरित्रावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि. 2) झाले. यावेळी पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घोषित केला आहे. या घोषणेनंतर राज्यासह देशाच्या राजकारंणात भूकंप झाला. त्यांच्या या कृतीचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. असे असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पवारांच्या आत्मचरित्रावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले की, शरद पवार यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग अजून मी वाचलेला नाही. त्यामुळे त्यावर काही बोलू शकत नाही. पण या सगळ्या राजकीय घडामोडींवर मी योग्यवेळी पुस्तक लिहीन, असे सूचक विधान त्यांनी केले.

दरम्यान, शरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्या पक्षातील तो अंतर्गत विषय आहे. ते यापुढेही राजकारणात सक्रिय राहतील, त्यांचे मानाचे स्थान कायम राहील, असे मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केल्याने पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात (sharad pawar books) उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला. अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. साहेब, निवृत्तीचा निर्णय मागे घ्या, अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली.

Back to top button