गुवाहाटी; वृत्तसंस्था : दारूचे व्यसन असणार्या 300 पोलिस कर्मचार्यांना स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय देण्याची योजना आसाम सरकारकडून तयार केली आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा सांगितले 300 पोलिसांना दारूचे व्यसन आहे. त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने आपली ड्युटी पार पाडू शकत नाहीत. (Voluntary Retirement)
दारूमुळे त्यांचे शरीर कमजोर झाले आहे. दारू पिणार्या पोलिसांसाठी स्वेच्छा निवृत्तीचा नियम आहे; पण त्याची कधीच अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. मात्र, आता आसाममध्ये पहिल्यांदाच स्वेच्छा निवृत्ती दिली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Voluntary Retirement)
या पोलिसांच्या निवृत्तीनंतर 300 नव्या पोलिसांची भरती केली जाईल. दुसरीकडे आसाममध्ये ड्युटीवर असताना दारू पिल्याच्या आरोपाखाली यापूर्वी अनेक पोलिसांना निलंबित केले आहे. दरम्यान, 10 मे रोजी आसाममध्ये भाजप सरकारची दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रशासन चांगले करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
अधिक वाचा :