Afzal Ansari And Mukhtar Ansari : गँगस्टर मुख्तार अन्सारीला १०, अफजालला ४ वर्षे कारावास | पुढारी

Afzal Ansari And Mukhtar Ansari : गँगस्टर मुख्तार अन्सारीला १०, अफजालला ४ वर्षे कारावास

गाझीपूर; वृत्तसंस्था : माफिया डॉन तसेच यूपीतील गाझीपूरचा कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याला 10 वर्षे कारावासाची शिक्षा शनिवारी गाझीपूर एमपी/एमएलए न्यायालयाने ठोठावली. मुख्तारचा भाऊ तसेच खासदार अफजाल याला 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. (Afzal Ansari And Mukhtar Ansari)

याव्यतिरिक्त मुख्तार याला 5 लाख रुपये, तर अफजालला 1 लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास दोघांना अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. (Afzal Ansari And Mukhtar Ansari)

मुख्तार अन्सारी हा बांदा कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीला हजर राहिला, तर अफजाल स्वतः न्यायालयात हजर होता. अफजाल अन्सारीला 2 वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झाली आहे. ते बहुजन समाज पक्षाचे खासदार आहेत. आता त्यांचे लोकसभा सदस्यत्व जाणार हे ठरल्यात जमा आहे. सरकारी वकील नीरज श्रीवास्तव यांनीही त्याला दुजोरा दिला. (Afzal Ansari And Mukhtar Ansari)

भाजप आमदारासह 7 जणांचे हत्याकांड 

  • 1985 ते 2002 पर्यंत गाझीपूरच्या मोहम्मदाबाद विधानसभा मतदारसंघावर अन्सारी बंधूंचे वर्चस्व होते.
  • 2002 मध्ये भाजप नेते कृष्णानंद राय यांनी अन्सारी कुटुंबाची मक्तेदारी मोडीत काढून निवडणूक जिंकली व आमदार झाले.
  • 2005 साली 29 नोव्हेंबर रोजी आमदार राय यांचे वाहन अडवून 8 जण एसयूव्हीमधून खाली उतरले. एके-47 मधून सुमारे 500 राऊंड फायर करण्यात आले. आमदार राय व गाडीतील 6 जण जागीच मरण पावले.

मुख्तार 5 वेळा आमदार

  • मुख्तार हा महू विधानसभा मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहिला आहे.
  • 2005 मधील हिंसाचारात त्याचे नाव आल्यानंतर त्याने आत्मसमर्पण केले.

खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष सुटका; पण अनुषंगिक प्रकरणात शिक्षा

  • माजी आमदार कृष्णानंद राय हत्येप्रकरणी अन्सारी बंधूंची 4 वर्षांपूर्वीच निर्दोष सुटका झाली असली, तरी गँगस्टर अ‍ॅक्टचे हे प्रकरणही याच खटल्याशी निगडित आहे.
  • कृष्णानंद राय यांच्या हत्येच्या (2005) प्रकरणात हत्येनंतर 2 वर्षांनी 2007 मध्ये पोलिसांनी मुख्तार अन्सारी व त्याच्या भावावर गँगस्टर अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
  • राय यांच्या हत्येनंतर झालेली जाळपोळ, आंदोलन व व्यावसायिक नंदकिशोर रुंगटा यांचे अपहरण तसेच हत्येच्या प्रकरणात हा गुन्हा दोघांवर नोंदवण्यात आला होता.
  • 2007 नंतर म्हणजे तब्बल 16 वर्षे हे प्रकरण गाझीपूरच्या एमपी/एमएलए कोर्टात न्यायप्रविष्ट होते.
  • गतवर्षी 23 सप्टेंबर रोजी दोन्ही भावांवर गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  • न्यायालयाच्या निर्णयापूर्वी कृष्णानंद राय यांच्या पत्नी अलका राय यांनी आपला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले.
  • न्यायालयाने आमची मूळ प्रकरणात निर्दोष सुटका केली आहे. त्यामुळे गँगस्टर कायद्यांतर्गत सुरू असणार्‍या या खटल्याला कोणताही आधार नाही, असे अफजाल अन्सारी म्हणाले होते.

अधिक वाचा :

Back to top button