उ. प्रदेशमधील माफिया मुख्तार अन्सारीला १० वर्षांची शिक्षा, ५ लाखांचा दंड

उ. प्रदेशमधील माफिया मुख्तार अन्सारीला १० वर्षांची शिक्षा, ५ लाखांचा दंड
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील माफिया मुख्‍तार अन्‍सारी ( Mukhtar ansari )  याला गाझीपूर खासदार-आमदार विशेष न्‍यायालयाने 'गँगस्टर' कायद्यांतर्गत आज ( दि. २९)  १० वर्षांची शिक्षा ठोठावली. त्‍याला पाच लाखांच्‍या दंडाची शिक्षा सुनावली आहे. उत्तर प्रदेशमधील कुख्‍यात गँगस्‍टर अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अश्रफ या दोघांची शनिवार, १५ मार्च २०२३ रोजी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली होती. यानंतर राज्‍यात मुख्‍तार अन्‍सारी याला होणार्‍या शिक्षेकडे संपूर्ण राज्‍य लक्ष लागले होते.

आमदार कृष्णानंद राय खून प्रकरण आणि व्यापारी नंदकिशोर रुंगटा अपहरणानंतर मुख्तार आणि अफजल यांच्यावर गँगस्टर कायद्यांतर्गत  गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची सुनावणी १ एप्रिल रोजी पूर्ण झाली होती.

२९ नोव्‍हेंबर २००५ रोजी गाझीपूर येथील मोहम्मदाबादमधील भाजपचे तत्कालीन आमदार कृष्णानंद राय यांची हत्‍या
करण्‍यात आली होती. भंवरकोल ब्लॉकमधील सियादी गावात आयोजित एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित असताना कृष्णानंद राय यांची हत्या करण्यात आली होती. सामन्याचे उद्‍घाटन करून ते परत येत असताना बसनिया चाटीजवळ घुसलेल्या हल्लेखोरांनी कृष्णानंद राय यांच्या ताफ्यावर AK-47 च्या ५०० राऊंड फायर केले होते.

Mukhtar ansari : अन्‍सारी बंधू मुख्‍य आरोपी

आमदार कृष्णानंद राय हत्‍या प्रकरणी मुख्तार अन्सारी आणि अफजल हे मुख्‍य आरोपी होते. २००२ मध्ये अन्सारी बंधूंचे वर्चस्‍व असलेल्या मोहम्मदाबाद विधानसभा मतदारसंघात भाजपचे कृष्णानंद राय यांनी अफजल अन्सारी याचा पराभव केला होता. कृष्‍णानंद राय हत्‍या प्रकरणी अफजल अन्सारी, त्याचा भाऊ माफिया डॉन मुख्तार अन्सारी आणि मेहुणा एजाझुल हक यांच्यावर २००७ मध्ये गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.एजाजुल हक यांचे निधन झाले आहे.

२०१२ मध्‍ये सुरु झाली होती खटल्‍याची सुनावणी

आमदार कृष्णानंद राय खून प्रकरण आणि व्यापारी नंदकिशोर रुंगटा अपहरण प्रकरणी गाझीपूर न्‍यायालयात २०१२ मध्‍ये खटला सुरु झाला होता. अंतिम युक्‍तीवाद १ एप्रिल २०२३ रोजी पूर्ण झाला.न्‍यायाधीशांनी निकालाची तारीख १५ एप्रिल निश्‍चित केली होती. मात्र यानंतर २९ एप्रिल रोजी निकाची तारीख जाहीर करण्‍यात आली होती.
आपलाही अतिक अहमद होण्‍याच्‍या भीतीने पछाडला मुख्‍यात अन्‍सारी

उत्तर प्रदेशमधील कुख्‍यात गँगस्‍टर अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अश्रफ या दोघांची शनिवार, १५ मार्च २०२३ रोजी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली होती. दोघांना पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना माध्‍यम प्रतिनिधी म्‍हणून आलेल्‍या हल्‍लेखोरांनी गोळीबार केला होता. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी म्‍हणजे १३ मार्च रोजी अतिकचा मुलगा असद हा उत्तर प्रदेश पोलिसांबरोबर इन्काऊंटरमध्ये मारला गेला होता. तीन दिवसांत अतिकच्या कुटुंबातील तिघांचा अंत झाल्याने प्रयागराजमधील ४० वर्षांपासूनचा माफियाराजही संपले आहे. अतिक प्रमाणे आता आपल्‍यावरही जीवघेणा हल्‍ला होईल, या भीतीने मुख्‍तार अन्‍सारीला पछाडले आहे, तशी भीती त्‍याने माध्‍यमांशी बोलतानाही व्‍यक्‍त केली आहे. दरम्‍यान कारागृहाचे डीजी एसएन सबत यांनी कारागृहातील कैद्यांचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी असल्याचे सांगितले आहे. ज्यासाठी मुख्तार अन्सारी यांना उच्च सुरक्षा बराकीत ठेवण्यात आले आहे, त्यांच्या बॅरेकवर सीसीटीव्हीद्वारे निरीक्षणात ठेवण्यात आली आहे.

मुख्‍तार अन्‍सारी हा खंडणी प्रकरणी पंजाबच्‍या कारागृहात होता. २०२१ मध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर त्‍याला रोपरहून बांदा कारागृहात हलविण्‍यात आले होते. आता तो बांदा कारागृहातून बाहेर पडायलाही घाबरत आहे. मुख्तार अन्सारी याचा खासदार भाऊ अफजल अन्सारी यानेही मुख्तारवर हल्‍ला होईल, अशी भीती व्‍यक्‍त केली आहे.

मुख्तारचा भाऊ अफजल अन्सारीला चार वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा

गँगस्‍टर ॲक्‍ट अन्‍वये मुख्‍तारचा भाऊ अफजल अन्सारीला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे. त्‍याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्‍यात आला आहे. शिक्षा जाहीर होताच अफजल अन्सारीला ताब्यात घेण्यात आले आहे. अफजल अन्‍सारीला चार वर्षांची शिक्षा सुनावल्‍यामुळे त्‍याची खासदारकी रद्‍द होणार आहे.

उत्तर प्रदेशमधील 'माफियाराज संपले' : अलका राय

माझा न्‍यायव्‍यवस्‍थेवर विश्‍वास आहे. आता उत्तर प्रदेशमधील माफियाराज संपले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे दिवंगत आमदार कृष्णानंद राय यांच्या पत्नी अलका राय यांनी या निकालानंतर दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news