Corona Updates : सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट, गेल्या २४ तासांत ७,१७१ नवीन रुग्णांची नोंद | पुढारी

Corona Updates : सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट, गेल्या २४ तासांत ७,१७१ नवीन रुग्णांची नोंद

पुढारी ऑनलाइन डेस्क : Corona Updates : देशात कोरोना रुग्णसंख्येत आज सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या २४ तासात ७,१७१ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ५१,३१४ आहे. काल (दि.२८) ही रुग्णसंख्या ७,५३३ इतकी होती. आज हा आकडा जवळपास 300 अंकांनी कमी झाला आहे. गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्येचा दर सातत्याने कमी-जास्त होत आहे.

Corona Updates : मुंबईत ६० वर्षावरील नागरिकांना इन्कोव्हॅक लसीकरण

मुंबईसह देशभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेने लसीकरण मोहीम हाती घेतली असून, शुक्रवारपासून इन्कोव्हॅक ही लस ६० वर्षावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून देणे सुरू केले.

हे ही वाचा :

India Corona Update : दिलासादायक! कोरोना रुग्णसंख्येत घट; देशात गेल्या २४ तासांत ७,५३३ नवे रुग्ण

कोरोनात अनाथ 55 हजार मुलांचे अनुदान रखडले

Back to top button