Thackeray vs Shinde | ठाकरेंना दिलासा! शिवसेनेची मालमत्ता शिंदे गटाकडे हस्तांतरित करण्याची याचिका फेटाळली | पुढारी

Thackeray vs Shinde | ठाकरेंना दिलासा! शिवसेनेची मालमत्ता शिंदे गटाकडे हस्तांतरित करण्याची याचिका फेटाळली

पुढारी ऑनलाईन : ठाकरे गटाकडून शिवसेनेची मालमत्ता शिंदे गटाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. उद्धव ठाकरे गटाकडे असलेली शिवसेना पक्षाची सर्व मालमत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे हस्तांतरित करण्यात यावी. त्यासाठी महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. (Thackeray vs Shinde)

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते मुंबईतील वकील आशिष गिरी यांच्या अधिकाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. “तुम्ही कोण आहात? तुमचा अधिकार काय आहे,” असा सवाल करत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

ठाकरे आणि शिंदे गटांमधील वादाशी संबंधित विविध याचिकांवर सुनावणी सुरू असल्याने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाची मालमत्ता शिंदे गटाकडे हस्तांतरित करा, असे आशिष गिरी यांनी याचिकेत म्हटले होते.

“ही कोणत्या प्रकारची याचिका आहे आणि तुम्ही कोण आहात? तुमची विनंती मान्य केली जाऊ शकत नाही,” असे खंडपीठाने याचिका फेटाळताना म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने १६ मार्च रोजी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकेवरील निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह दिले असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. (Thackeray vs Shinde)

 हे ही वाचा :

Back to top button