COVID19 Update: गेल्या २४ तासांत कोरोना रूग्ण संख्येत किंचितशी घट

कोरोना रूग्‍णसंख्या
कोरोना रूग्‍णसंख्या
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: देशात कोरोना रूग्णांमध्ये कालच्या तुलनेत आज (दि.२७) किंचितशी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ९ हजार ३५५ कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर काल सक्रिय रूग्णांची संख्या ९ हजार ६२९ इतकी होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आत्तापर्यंत सक्रिय रूग्णांची संख्या ५७ हजार ४१० पर्यंत पोहचली आहे.

राजधानी दिल्लीत गोल्या २४ तासांत १ हजार ४० कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. १३२० रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. या महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ७८४ नवीन कोरोना रूग्णांची नोद झाली आहे. १०९९१ कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news