Misal Pav : जागतिक बेस्ट वेगन शाकाहारी पदार्थांमध्ये ‘मिसळ पाव’चा समावेश, जाणून घ्या अधिक | पुढारी

Misal Pav : जागतिक बेस्ट वेगन शाकाहारी पदार्थांमध्ये ‘मिसळ पाव’चा समावेश, जाणून घ्या अधिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची संस्कृती आणि वारसा अबाधित ठेवण्यासाठी येथील खाद्यपदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतात. देशातील विविध प्रदेशातील विविध पाककृती लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. चविष्ठ खाद्यपदार्थांचे अनेक प्रकार इथे पहायला मिळतात. या खाद्यपदार्थांचा चाहता वर्ग भारतात मोठ्या प्रमाणात आहेच, पण जगभरात देखील याचे खवय्ये पहायला मिळतात. खाद्यपदार्थ विषयीच्या सोशल मीडियावरील टेस्ट अ‍ॅटलस या अकाऊंटवरुन याबाबतची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मिसळ-पावचा (Misal Pav)  समावेश झाला आहे.

टेस्ट अ‍ॅटलास यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. बेस्ट पारंपारिक वेगान खाद्यपदार्थांची यादी अशी ही पोस्ट आहे. यामध्ये जगातल्या काही प्रसिद्ध आणि चविष्ठ अशा खाद्यपदार्थांची यादी दिली आहे. त्यांनी दिलेल्या यादीमध्ये महाराष्ट्रीयन मिसळ पावची ११व्या स्थानी वर्णी लागली आहे. भारतातील स्वादिष्ट खाद्यपदार्थांपैकी एक असणाऱ्या या मिसळ पावच्या (Misal Pav) जागतिक प्रसिद्धीमुळे महाराष्ट्राची मान अजून उंचावली आहे. ग्वाकामोल, हम्मस आणि स्पेगेटी एग्लियो ई ओलियो यांसारखे अनेक पदार्थ या यादीत आहेत. मिसळ ही एक मसालेदार आणि झणझणीत अशी ही डीश आहे. झणझणीत मिसळचा रस्सा आणि कांदा-लिंबू, शेव-चिवडा याचे मिश्रण असणारा हा पदार्थ पावासोबत खाल्ला जातो.

बेस्ट पारंपारिक वेगान खाद्यपदार्थांच्या टॉप ५० मध्ये स्थान मिळवणारे आणखी काही भारतीय पदार्थ देखील आहेत. यामध्ये 20 व्या स्थानावर आलू गोबी, 22 व्या स्थानावर राजमा आणि 24 व्या स्थानावर कोबी मंचुरियन आहे. त्याचबरोबर राजमा चावल हा देखील एक पदार्थ आहे ज्याला 41 वे स्थान मिळाले आहे.

खाद्यपदार्थांनी संपूर्ण जगाला भारताची वेगळीच ओळख निर्माण करुन दिली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांच्या यादीत अनेक भारतीय खाद्यपदार्थांनी निर्माण केलेले स्थान.

 

View this post on Instagram

 

A post shared by TasteAtlas (@tasteatlas)

हेही वाचा

Back to top button