

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री व्हायला कुणालाही आवडेल, मला वाटतं यात काहीही वावगं नाही. अनेकांना मुख्यमंत्री व्हायला आवडते, पण सगळ्यांनाच होता येते असे नाही. ठीक आहे आमच्या त्यांना शुभेच्छा, अशा शब्दांमध्ये शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या अजित पवार राजकीयदृष्ट्या चर्चेत आहे. याच संदर्भात नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी वारंवार खुलासा केला असला तरी मविआचे नेत्यांची रोज सुलट विधाने आणि शिंदे -फडणवीस सरकारमधून अजित दादांच्या स्वागताची वक्तव्य येत असल्याने याविषयीचा संभ्रम कायम आहे.
गेले काही दिवस आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, भाकित केली जात आहे तर केली जात आहे संदर्भात आपण शांत का, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, माझे यामुळे एंटरटेनमेंट होते. भांडण लावायला कुणाची गरज नाही, असा टोला त्यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.मात्र, महाविकास आघाडीतूनच अजित पवार यांनी बाहेर पडावे असा प्रयत्न चालला आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस म्हणाले, "मी आधीपासून बोलत आहे.त्यांच्या पक्षांतर्गत काय चालले मला माहित नाही मात्र वज्रमुठ वज्रमुठ असा जे ते दावा करतात ती वज्रमुठ राहिलेली नाही त्याला इतक्या भेगा पडलेल्या आहेत."
हेही वाचा :