Twitter : अमिताभ बच्चन शाहरुख खान सह या सेलिब्रिटींचे ब्ल्यू टिक काढले; पैसे न भरलेल्यांचे ब्ल्यू टिक काढण्यास आजपासून सुरुवात | पुढारी

Twitter : अमिताभ बच्चन शाहरुख खान सह या सेलिब्रिटींचे ब्ल्यू टिक काढले; पैसे न भरलेल्यांचे ब्ल्यू टिक काढण्यास आजपासून सुरुवात

पुढारी ऑनलाइन डेस्क : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने Twitter आजपासून वेरिफाइड अकाउंटचे फ्री ब्ल्यू टिक काढण्यास सुरुवात केली आहे. ज्यांनी ट्विटर ब्ल्यू प्लानसाठी पैसे भरलेले नाही त्यांच्या अकाउंटवरून ब्ल्यू टिक काढून टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये सेलिब्रिटी, राजकारणी सारख्या मोठमोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. एलॉन मस्कने यापूर्वीच याची घोषणा केली होती. 20 एप्रिल नंतर ज्यांनी पेड सबस्क्रिप्शन घेतलेले नाही. त्यांचे ब्ल्यू टिक काढण्यात येईल, अशी घोषणा मस्कने केली होती.

Twitter : या स्टार सेलिब्रिटींचे ब्ल्यू टिक काढले

ट्विटरने इंडियाने व्हेरिफाइड अकाउंटचे ब्लू टिक साइन गुरुवारपासून पूर्णपणे पेड केले आहे. ज्यांनी हे पेड सबस्क्रिप्शन घेतलेले नाही त्यांच्या अकाउंटवरील ब्लू टिक काढले आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उप मुख्यमंत्री ब्रजेश पाठक, बसपा सुप्रीमो मायावती, भाजप प्रदेश अध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांच्या सहित सरकारमधील अनेक मंत्र्यांचे, तसेच राजकीय नेत्यांचे ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय सुपरस्टार अमिताभ बच्चन, किंग शाहरुख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचेही ब्लू टिक काढले आहेत.

Twitter : काय आहे ब्ल्यू टिक?

एलॉन मस्कने ट्विटरला खरेदी केल्यानंतर त्यात बदल करण्यास सुरुवात केली. यामध्ये सर्वात पहिले ट्विटर ब्लूची सेवा पेड केली. ट्विटर ब्लू ही तुमचे खात्याची सत्यता पडताळणी तसेच फेक नाही यासाठी दिली जाणारी एक सेवा होती. ती सुरुवातीला अनपेड होती. नंतर त्यावर शुल्क लावण्यात आले. सुरुवातीला फक्त स्टार आणि सेलिब्रिटीसाठी होती. मात्र, नंतर ट्विटर व्हेरिफाइड आणि ब्लू टिक हे सर्वांसाठी पेड म्हणजेच पैसे भरून सेवा सुरू केली. तसेच ब्ल्यू टिक घेतलेल्या सदस्यांना ट्विट एडिट करणे अनडू करण्यासारख्या आणखी काही सुविधा यासोबत फ्री मिळतात. ट्विटर ब्लूची किंमत मोबाईलसाठी प्रति महिना 900 रुपये आणि वेब आवृत्तीसाठी 650 रुपये आहे.

हे ही वाचा :

14 श्री सदस्यांचा मृत्यू उष्माघात, डिहायड्रेशनमुळे; शवविच्छेदनाच्या अहवालातील निष्कर्ष

लोणावळा : आयपीएल मॅचवर बेटिंग घेणार्‍यांवर गुन्हा

Twitter logo changed : ट्विटरवरील’ब्लू बर्ड’ गेला, त्‍याच्‍या जागी ‘डॉगी’ आला!

Back to top button