14 श्री सदस्यांचा मृत्यू उष्माघात, डिहायड्रेशनमुळे; शवविच्छेदनाच्या अहवालातील निष्कर्ष | पुढारी

14 श्री सदस्यांचा मृत्यू उष्माघात, डिहायड्रेशनमुळे; शवविच्छेदनाच्या अहवालातील निष्कर्ष

पनवेल; पुढारी वृत्तसेवा :  खारघरमध्ये 16 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर तेथे आलेल्या 14 श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. बुधवारी आलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार या श्री सदस्यांचा मृत्यू हा उष्माघात आणि निर्जलीकरण (डिहायड्रेशन) यामुळे झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मृत पावलेल्या 14 श्री सदस्यांच्या शरीरात पाण्याचा अंश शिल्लक नसल्याची माहिती काही डॉक्टरांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली आहे. या सदस्यांनी जवळपास सहा ते सात तास काही खाल्ले नसावे. त्याचबरोबर ते पाणी प्यायले नसावेत, असे या डॉक्टरांनी पुढे सांगितले.

खारघरमधील कार्यक्रमानंतर झालेल्या या 14 श्री सदस्यांच्या मृत्यूमुळे राज्यातील राजकारण तापले होते. या प्रकरणाची चौकशी करावी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. श्री सदस्यांचा मृत्यू उष्माघाताने नाही, तर चेंगराचेंगरीत झाला असावा, असा तर्कवितर्क लावला जात होता.

 

Back to top button