

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याअनुषंगाने आयोगाने ८.९२ लाख वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (वीवीपीएटी) मशीन खरेदीचे आदेश दिले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत या मशीनचा वापर केला जाईल. यापूर्वी २.७१ लाख एम-२ मॉडेल वीवीपॅट मशीन कार्यमुक्त केल्या जातील.
निवडणूक आयोगाकडून दर लोकसभा निवडणुकीपूर्वी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तसेच वीवीपॅट मशीनच्या फिटनेसची तपासणी केली जाते. आयोगाकडून आता वीवीपॅट मशीनचे अद्ययावत एम ३ तसेच एम२एम३ चा प्रयोग केला जाईल. ३.४३ लाख वीवीपॅट मशीनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तर, २.४३ लाख मशीन्स अद्ययावत केल्या जात आहेत. लवकरात लवकर देशातील सर्व भागात वीवीपॅट मशीनचे अदययावत मशीन तैनात करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १७.४ लाख वीवीपॅट मशीन तैनात करण्यात आल्या होत्या. देशातील प्रत्येक मतदान केंद्रावर त्याचा उपयोग करण्यात आला होता, हे विशेष.
हेही वाचा :