गँगस्‍टर अतिक अहमदचे वकील मिश्रांच्‍या घराजवळ बॉम्बहल्ला! परिसरात दहशत | पुढारी

गँगस्‍टर अतिक अहमदचे वकील मिश्रांच्‍या घराजवळ बॉम्बहल्ला! परिसरात दहशत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील कुख्‍यात गँगस्‍टर अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अश्रफ यांच्‍या हत्‍येनंतर आज ( दि.१८) प्रयागराजमधून आणखी एक खळबळजनक घटना घडली. अतिक अहमदचा वकील  विजय मिश्रा यांच्‍या घराजवळ बॉम्‍बहल्‍ला झाला असून, या घटनेने प्रयागराजमध्‍ये प्रचंड खळबळ माजली आहे. दहशत पसरविण्‍याच्‍या उद्देशानेच बॉम्‍बफेक झाल्‍याचे आरोप मिश्रा यांनी केला आहे.  याप्रकरणाचा तपास कर्नलगंज पोलिस करत आहेत.

अतिक अहमद याचे वकील विजय मिश्रा यांच्‍या घराजवळ बॉम्‍बहल्‍ला झाल्‍याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्‍यान हा हल्‍ला विजन मिश्रा यांना टार्गेट करण्‍यासाठी करण्‍यात आला नव्‍हता असा दावा स्‍थानिक पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणी माहिती देताना कर्नलगंज पोलिस ठाण्‍यो निरीक्षक राम मोहन राय यांनी सांगितले की, कटरा गोबर गल्‍लीमध्‍ये आज दुपारी क्रूड बॉम्ब फेकण्यात आला. या गल्‍लीत राहणार्‍या छोटू यादव बरोबर हर्षित सोनकर याचा वाद झाला होता. हर्षितने छोटूला लक्ष्य करत बॉम्ब फेकल्याचा आरोप होत आहे. या हल्‍ल्‍याशी अतिक याचे वकील विजय मिश्रा यांचा संबंध नाही. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. भीती आणि दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा वकील मिश्रा यांनी केला आहे.

Back to top button