हरियाणा : पुढारी ऑनलाईन कर्नालमध्ये तीन मजली राईस मिलची इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या गिरणीच्या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कामगार अडकले हाेते. या दुर्घटणेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. दरम्यान ही घटना घडली तेव्हा सुमारे 150 कामगार इमारतीतच होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कामगार इमारतीच्या आत झोपायचे. अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचावकार्य सुरू आहे.
प्रथमदर्शनी इमारतीत काही दोष असल्याचे आढळून आले आहे. या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. राईस मिल मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :