[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मध्य भारताबरोबर उत्तर भारतातही उष्णतेची लाट सुरु झाली असून पुढील पाच दिवस अनेक राज्यात गरम वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राजधानी दिल्लीत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.
उत्तर भारतात बहुतांश भागात पुढील चार ते पाच दिवस तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. पूर्व, उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंश सेल्सिअसने जास्त राहील. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फरिदाबादमध्ये शनिवारी सर्वाधिक ४३.१ अंश इतके तापमान नोंदविले गेले. याशिवाय नोएडा येथे ४०.८ अंश सेल्सिअस, गुरुग्राम येथे ४१, गाजियाबाद येथे ३९.७ अंश से. तापमानाची नोंद झाली. उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे सर्वाधिक ४४.२ अंश से. तर आग्रा येथे ४२.६ अंश से. तापमान नोंदविले गेले.
हेही वाचा :