दुर्दैवी घटना : अंगावर वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू; महिला जखमी

दुर्दैवी घटना : अंगावर वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू; महिला जखमी

वाळकी : नगर तालुक्यातील रुईछत्तीशी परिसरातील गोरे वस्तीवरील शेतात अंगावर वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू झाला.
शेतात काम करणारी एक महिला जखमी झाली. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. अशोक विठोबा गोरे (वय 45 रा. रुईछत्तीशी)
असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

रुईछत्तीशी परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वारा व विजांचा कडकडाट होऊन पावसास सुरुवात झाली. शेतात कांदा काढणीची कामे करणारे महिला मजूर व शेतकरी शेतातून घरी परतत होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उभे असलेले शेतकरी अशोक गोरे यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला.

तर, शेतात काम करणारी मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील एक महिला जखमी झाली आहे. अशोक गोरे यांना पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र भापकर व त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news