Yamuna Expressway Accident
Latest
Yamuna Expressway Accident : यमुना एक्स्प्रेस वेवर बसला भीषण अपघात; ३ जणांचा जागीच मृत्यू
मथुरा ; पुढारी ऑनलाईन दिल्लीहून बिहारकडे चाललेल्या बसला यमुना एक्स्प्रेसवर भीषण (Yamuna Expressway Accident) अपघात झाला. यमुना एक्स्प्रेसवेवरील दुभाजकाला धडकून ही बस उलटली. या अपघातामध्ये ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १२ प्रवाशी जखमी झाले आहेत. या जखमी लोकांना उपचारांसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघाताचा स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू आहे.

