BSF Punjab Frontier : घुसखोर ड्रोनला बीएसएफच्या जवानांनी पाडले; 3.2 KG हेरॉईन जप्त

BSF Punjab Frontir
BSF Punjab Frontir
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : BSF Punjab Frontier : भारत पाकिस्तानच्या पंजाब सीमेवर घुसखोरी करणाऱ्या एका ड्रोनला बीएसएफच्या जवानांनी गोळीबार करून पाडले. या नष्ट केलेल्या ड्रोनमधून तब्बल 3 किलोच्या हेरॉईनच्या पिशव्या बीएसएफ जवानांनी जप्त केल्या आहेत.

बीएसएफ पंजाब फ्रंटियरने BSF Punjab Frontier ही कारवाई केली आहे. दिलेल्या माहितीनुसार, आज 15 एप्रिल रोजी पहाटे 3.21 च्या सुमारास सीमा भागात तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांना हा घसुखोर ड्रोन दिसला. यावेळी त्यांनी ड्रोनवर गोळीबार केला. यामध्ये ड्रोन खाली पडले. जवानांनी परिसरात शोध घेतला असता, अमृतसर जिल्ह्यातील बच्चीविंड गावाजवळील शेतातून 3 पॅकेट्स (ब्लिंकरसह) (Wt-appx 3.2 किलो) हेरॉईनची बॅग जप्त केली. तसेच परिसरात जवानांनी आणखी शोध मोहीम राबवली आहे, अशी माहिती बीएसएफ पंजाब फ्रंटियरने दिली. एएनआयने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

BSF Punjab Frontier : ड्रोनची घुसखोरी दिवसेंदिवस वाढत आहे

दरम्यान, बीएसएफच्या जवाानांनी कारवाई करत ड्रोन पाडले असले तरी, अलीकडे अशा प्रकारे ड्रोनच्या माध्यमातून घुसखोरी करून सीमेपलीकडून भारतात नशेचे पदार्थ पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. बीएसएफच्या जवानांनी यापूर्वही कारवाई करत अनेकवेळी अशा प्रकारे घुसखोर ड्रोनला पाडले आहे. तसेच त्यातून खाली पडलेल्या बॅगमधून नशेचे पदार्थ जप्त केले आहे.

BSF Punjab Frontier : 27 मार्चला केली होती कारवाई

यापूर्वी 27 मार्चला बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानी ड्रोनला पाडले होते. भारत पाकिस्ताच्या पंजाब जेसीपी अटारी सीमा परिसरात तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना सोमवारी (दि.27) रात्री 8.20 च्या सुमारास पाकिस्तानकडून एक ड्रोन (Pakistani Drone) घुसल्याचे आढळले. त्यानंतर तातडीने या ड्रोनवर बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. तसेच ड्रोनविरोधी उपाययोजना सक्रिय करून हे ड्रोन पाडण्यात आले. पाडलेल्या ड्रोनच्या झडती दरम्यान त्यातून 2 किलोचे हेरॉईन प्रतिबंधित पॅकेट सापडले, अशी माहिती बीएसएफ कडून देण्यात आली. एएनआयने ट्वीट करून ही माहिती पोस्ट केली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news