Indian Railways : पहिला हायस्पीड टेस्टिंग रेल्वे ट्रॅक होतोय तयार; असणार ताशी २२० कि.मी. वेग | पुढारी

Indian Railways : पहिला हायस्पीड टेस्टिंग रेल्वे ट्रॅक होतोय तयार; असणार ताशी २२० कि.मी. वेग

[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”अधिक पहा” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”10″ order=”ASC” orderby=”post_date” view=”circles” /]

जयपूर; वृत्तसंस्था : भारतीय रेल्वे देशातील हायस्पीड ट्रेनसाठी राजस्थानातील जोधपूरलगतच्या गुढा-थथाना मिठाडी या लहान स्थानकांदरम्यान हा 59 कि.मी.चा हायस्पीड टेस्टिंग ट्रॅक तयार होत आहे. या ट्रॅकवर ताशी 220 कि.मी. वेगाने धावणार्‍या गाड्यांची चाचणी होईल. (Indian Railways)

वंदे भारत एक्स्प्रेससह अन्य हायस्पीड गाड्यांचा त्यात समावेश असेल. चाचणी केली जाईल. पहिल्या टप्प्यातील हायस्पीड टेस्ट ट्रॅकचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण केले जाईल. दुसरा टप्पा डिसेंबर 2014 पर्यंत पूर्ण होईल. चाचणी ट्रॅक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, रोलिंग स्टॉकसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची चाचणी सुविधा असलेला भारत हा जगातील पहिला देश ठरेल, हे विशेष! (Indian Railways)

नव्या ट्रॅकची गरज का? (Indian Railways)

  • रेल्वे पहिल्यांदाच अ‍ॅल्युमिनियमच्या 100 वंदे भारत एक्स्प्रेस बनवते आहे.
  • सध्या भारतीय रेल्वे स्टेनलेस स्टीलच्या गाड्या तयार करते.
  • अलीकडेच वंदे भारत एक्स्प्रेससाठी 30 हजार कोटींच्या निविदा जारी झाल्या आहेत.
  • अ‍ॅल्युमिनियमच्या गाड्या स्टेनलेस स्टीलच्या गाड्यांपेक्षा हलक्या असतात.
  • …अन् म्हणून त्या ताशी २०० कि.मी.हून अधिक वेगाने धावू शकतात.
[web_stories title=”true” excerpt=”true” author=”true” date=”true” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”1″ order=”ASC” orderby=”post_date” view=”list” /]

‘वंदे भारत’चे हे ५ अभिमानबिंदू!

1 या रेल्वेचे डिझाईन तसेच तंत्र पूर्णपणे देशी (भारतीय) आहे.
2 पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सातत्याने
4 वर्षे सेवा देते आहे.
3 विदेशातील खर्चापेक्षा 60 टक्के कमी खर्चात ती बनते आहे.
4 विदेशात एका गाडीला 3 वर्षे लागतात. आपल्याला 18 महिने.
5 अपघात झाल्यास प्रवासी सुरक्षित राहतील, असा पुढील भाग.

रोलिंग स्टॉक म्हणजे काय?

  • रेल्वेमध्ये वापरल्या जाणार्‍या सर्वप्रकारच्या डब्यांना रोलिंग स्टॉक म्हणतात.
  • मालगाड्यांतील प्रवासी डबे आणि व्हॅगन यांनाही रोलिंग स्टॉक असेच म्हटले जाते.

आकडे बोलतात…

  • 23 कि.मी. हायस्पीड रेल्वे ट्रॅकची मुख्य लाईन
  • 13 कि.मी.चा हायस्पीड लूप गुढा येथे
  • 3 कि.मी.चा क्वीक टेस्टिंग लूप नवा येथे असेल
  • 20 कि.मी. कर्व्ह टेस्टिंग लूप मिथ्रीमध्ये असेल
  • 31.5 कि.मी. हायस्पीड स्ट्रेचचे काम सुरू

हायस्पीड टेस्ट ट्रॅक बनवण्याचा प्रकल्प एक चांगली सुरुवात आहे. 200 वर स्पीड मिळवायचा तर आपल्याला दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा या प्रमुख मार्गांचेही ट्रॅक अपडेट करावे लागतील.
– सुधांशू मणी,
इनोव्हेटर, वंदे भारत एक्स्प्रेस

 

Back to top button