CM Arvind Kejriwal : केजरीवाल यांची रविवारी सीबीआयकडून चौकशी | पुढारी

CM Arvind Kejriwal : केजरीवाल यांची रविवारी सीबीआयकडून चौकशी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांची रविवारी चौकशी होणार आहे. सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर रहावे, असे समन्स सीबीआयने केजरीवाल यांना बजावले आहे.

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तपास संस्थांनी आप नेते व माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह अनेक लोकांना अटक केलेली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनाच तपास संस्थेने चौकशीसाठी बोलावणे धाडल्याने आम आदमी पक्षाच्या संकटात भर पडली आहे. दरम्यान ‘आप’ ने सीबीआयच्या नोटिशीवर प्रतिक्रिया देताना हा केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या अटकेचा कट असल्याचा आरोप केला आहे. पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी व उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधाची पोलखोल आम आदमी पक्षाने केली होती, त्यामुळे तपास संस्थांच्या माध्यमातून केजरीवाल यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र अशा गोष्टींमुळे केजरीवाल अथवा आप घाबरणार नाही. तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात आम्ही बोलतच राहू, असे आप नेते संजय सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गेल्या 26 फेब्रुवारी रोजी मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. नंतर ईडीकडून सिसोदिया यांच्याविरोधात हवाला प्रतिबंधक कायद्यातील कलमे लावण्यात आली होती. सिसोदिया हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो OSCAR Award : ब्लॅक ड्रेसमध्ये दीपिकाचा जलवा आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचे हटके फोटो प्रियंकाचे व्हाईट ड्रेसमधील ग्‍लॅमरस फोटो वयात काय ठेवलंय! ऐश्वर्या नारकरच्या अदा पाहून वय विसरून जाल रश्मिका बनली क्रिकेटर्सची क्रश; नेटकरी म्हणताच…. व्हाईट शॉर्ट वनपीसमध्ये हॉट झाली मौनी रॉय सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस ठरली रुपाली भोसले अनन्याने हॉट फोटोशूट करत उन्हाळ्यात वाढवला आणखी उष्मा बोल्ड आणि बिनधास्त सई