

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्हाला पूर्णपणे माफ केले आहे;पण मलाही माफ करा, मी तुम्हाला सुनावणीची तारीख दिली आहे. तुम्ही माझ्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करु नका, अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणी तारखेबाबत संभ्रम निर्माण करणार्या वकिलांना फटकारले. मागील महिन्यातही सरन्यायाधीशांना याच मुद्यांवरुन एका वरिष्ठ वकिलांची हजेरी घेतली होती.
एका याचिकेवरील सुनावणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी १७ एप्रिल रोजी सूचीबद्ध केली होती. सुनावणीसाठी आधीची तारीख मिळविण्यासाठी वकिलाने दुसर्या खंडपीठासमोरील प्रकरणाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, "तुमच्या याचिकेवरील सुनावणीची तारीख १७ एप्रिल आहे. तुम्हाला १४ तारखेला दुसर्या खंडपीठासमोर सुनावणी आहे. त्याचा येथे उल्लेख येथे करु नका. तुम्हाला पूर्णपणे माफ केले आहे; पण मलाही माफ करा. सुनावणीची तारीख १७ म्हणजे १७ रोजी आहे. माझ्या अधिकारात हस्तक्षेप करु नका."
मागील महिन्यातही सरन्यायाधीशांनी वकिलांना सुनावले होते खडेबोल मागील महिन्यातही सरन्यायाधीशांनी तारखांवरुन एका वरिष्ठ वकिलाने सुनावले होते की, "सरन्यायाधीशांना धमकावू नका. मी तुमच्यामुळे खचून जाणार नाही."
हेही वाचा :