‘उंदीर खून’ प्रकरणी ३० पानांचे आरोपपत्र दाखल!, गुन्‍हा सिद्ध झाल्‍यास आरोपीला होणार ५ वर्षांचा कारावास | पुढारी

'उंदीर खून' प्रकरणी ३० पानांचे आरोपपत्र दाखल!, गुन्‍हा सिद्ध झाल्‍यास आरोपीला होणार ५ वर्षांचा कारावास

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उंदीर हा शब्‍दच आपल्‍याकडे थोडा तिरस्‍काराने वापरला जातो. थट्टा-मस्‍करीत ‘उंदरा सारखा काय भीतोस? असा प्रश्‍न करतो या प्राण्‍याचे भित्रा हे विशेषही नकळत सांगितले जाते. हे सारं सांगण्‍याचे कारण म्‍हणजे याच उंदीर प्राण्‍याच्‍या खून प्रकरणी उत्तर प्रदेशमधील बदायू न्‍यायालयात ३० पानांचे आरोपपत्र दाखल झालं आहे, असे वृत्त दैनिक भास्‍करने दिले आहे. उंदीर खून प्रकरणी  आरोपपत्र दाखल करण्यात आलेले हे बहुधा देशातील पहिलेच प्रकरण आहे. जाणून घेवूया या प्रकरणाविषयी…

उंदीर खून प्रकरण नेमकं काय आहे?

उत्तर प्रदेशमधील बदायू येथील कोतवाली भागात मनोज आपल्‍या कुटुंबासह राहतो. भांडी बनवविण्‍याचा त्‍याच्‍या व्‍यवसाय आहे. २५ नोव्‍हेंबर २०२२ राजी त्‍याने घरात घुसलेला उंदीर पकडला. मनोज याने उंदराच्‍या शेपटीला दगड बांधला आणि त्‍याला नाल्‍यात फेकण्‍यासाठी तो नाल्‍याच्‍या कडेला गेला. मनोज उंदराला नाल्‍यात फेकत असताना येथून प्राणीप्रेमी विकेंद्र जात होता त्‍याने उंदारला सोडण्‍याची विनंती केली. मात्र मनोज याने ही विनंत धुडकावत उंदराला नाल्‍यात फेकून दिले. हा सर्व प्रकाराचे चित्रीकरण विकेंद्र याने आपल्‍या मोबाईलवर केले. या घटनेचा व्हिडिओ घेवूनच त्‍याने पोलीस स्‍टेशन गाठले. येथे त्‍याने मनोज विरोधात फिर्याद दिली.

प्राणीप्रेमींचा पाठपुरावा,  मृत्‍यू झालेल्‍या उंदराचे झाले पोस्टमॉर्टम

प्राणीप्रेमी विकेंद्रच्या तक्रारीनंतर मनोजवर प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये मनोजवर गुन्‍हा दाखल करावा का, यावर चार दिवस चर्चा झाली. अखेर विकेंद्रने दिलेल्‍या फिर्यादीनुसार पोलिसांनी मनोजवर २८ नोव्‍हेंबर २०२२ रोजी प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्‍यातील कलम-11 आणि कलम-429 नुसार गुन्‍हा दाखल केला. तक्रारदार विकेंद्र याने पोलिसांच्‍या मदतीने उंदराचा मृतदेह बदायूपासून ५० किलोमीटर दूर बरेली येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवला . शवविच्छेदनाचा खर्चही त्यांनीच उचलला. बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था येथे डॉ. अशोक कुमार आणि डॉ. पवन कुमार यांनी उंदराच्या शवाचे शवविच्छेदन केले.

Rat killing case :  श्‍वास गुदमरल्‍यामुळे मृत्‍यू झाल्‍याचे स्‍पष्‍ट

आयव्हीआयआरचे सहसंचालक डॉ. केपी सिंग यांनी सांगितले होते की, एका उंदराला शेपटीला दोरी बांधून नाल्यात बुडवून मारण्यात आले होते. तपासणीत उंदराची फुफ्फुस खराब असल्याचे आढळून आले. फुफ्फुसात सूज आली होती. यकृतात संसर्गही झाला होता. फुफ्फुसात नाल्यातील पाण्यासारखे कोणतेही अवशेष आढळले नाहीत. उंदराच्या शवाची सूक्ष्म तपासणी. त्याआधारे उंदराचा मृत्यू बुडून झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला.

Rat killing case : आरोपीला होवू शकते ५ वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा

या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणारे इन्स्पेक्टर राजेश यादव म्हणाले की, शवविच्छेदन अहवालात काहीही असले तरी प्राण्यांवर क्रूरता करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपी मनोजला दोषी मानून त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आता या प्रकरणी न्यायालय निर्णय घेणार आहे. एखाद्या प्राण्याला मारणे किंवा अपंग करणे यासाठी कलम-429 लागू आहे. यामध्ये दोषी आढळल्यास ५ वर्षे कारावास/दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावली जावू शकते.

… मग उंदीर मारण्‍याच्‍या औषधाची विक्री कशी होते? : आरोपी मनोजचा सवाल

उंदीर मारण्यासाठीच्‍या औषधांची बाजारात विक्री कशी होते, असा सवाल दैनिक ‘भास्‍कर’शी बोलताना आरोपी मनोज याने केला आहे. उंदीर मारण्‍यार्‍या औषधाची जाहिरात करणार्‍यावरही गुन्‍हा दाखल व्‍हावा. तसेच आतापर्यंत ज्‍यांनी उंदीर मारले आहेत त्‍यांच्‍यावर गुन्‍हा दाखल झाला व्‍हावा, अशी मागणी करत त्‍यांनी हा सर्व प्रकार मुर्खपणा असल्‍याचे म्‍हटले आहे. आता या प्रकरणी न्‍यायालय कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण उत्तर प्रदेशचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Back to top button