सोनी हत्याकांड प्रकरणातील आरोपींना उद्या सुनावणार शिक्षा; निकालाकडे सर्वांचे लक्ष | पुढारी

सोनी हत्याकांड प्रकरणातील आरोपींना उद्या सुनावणार शिक्षा; निकालाकडे सर्वांचे लक्ष

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या तुमसर शहरातील सोनी हत्याकांड प्रकरणी आज जिल्हा न्यायालयाने सात आरोपींवर आरोप निश्चित केले. या आरोपींना उद्या मंगळवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.

माहितीनुसार, २६ फेब्रुवारी २०१४ च्या मध्यरात्रीच्या सुमारास तुमसर येथील प्रतिष्ठित सोनेचांदीचे व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा द्रुमिल यांचा गळा आवळून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिघांच्याही मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या घरातून ८ किलो ३०० ग्रॅम किलो सोने, ३४५ ग्रॅम चांदी आणि रोख ३९ लाख रुपये असा एकूण साडेतीन कोटींचा ऐवज पळवून नेला होता.

ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून आरोपींना अटक केली. या घटनेचा तपास करण्यासाठी तत्कालिन पोलिस अधीक्षक कैलाश कणसे यांच्या मार्गदर्शनात १० जणांची टिम गठीत करण्यात आली होती. यामध्ये १०० अधिकारी, कर्मचाऱ्याचा समावेश होता.

दरम्यान आरोप निश्चित करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शहानवाज उर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, केसरी ढोले, सोहेल शेख, रफिक शेख यांचा समावेश आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत अ‍ॅड. उज्वल निकम उपस्थित होते. मात्र. उद्या, मंगळवारी (दि.११) रोजी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. या निकालाकडे तुमसर शहरासह जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

Back to top button