‘आयआयटी’ पदवी घेवूनही काही जण अशिक्षित राहतात : दिल्‍ली नायब राज्‍यपालांचा केजरीवालांवर हल्‍लाबोल

‘आयआयटी’ पदवी घेवूनही काही जण अशिक्षित राहतात : दिल्‍ली नायब राज्‍यपालांचा केजरीवालांवर हल्‍लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काही जण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( आयआयटी ) सारख्‍या संस्‍थेत पदवी घेवूनही अशिक्षित राहतात, अशा शब्‍दांमध्‍ये दिल्‍लीचे नायब राज्‍यपाल व्हीके सक्सेना यांनी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍यावर हल्‍लाबोल केला. केजरीवाल हे गेल्या मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. याबाबत सक्‍सेना त्‍यांनी त्‍यांच्‍यावर जोरदार टीका केली.

पदव्या म्हणजे शिक्षणाच्या खर्चाची पावती

केजरीवालांवर टीका करताना व्हीके सक्सेना म्‍हणाले की, "आपल्या पदवीचा कधीही अभिमान बाळगू नये. पदव्या म्हणजे शिक्षणाच्या खर्चाची पावती. शिक्षण आहे, जे माणसाचे ज्ञान प्रतिबिंबित करते. आजकाल आपण पाहिलेली वागणूक. आणखी एक गोष्ट सिद्ध झाली की काही लोक आयआयटी पदवी घेऊनही अशिक्षित राहतात."

एक दिवसापूर्वी भाजपच्‍या वतीने दिल्लीतील सरकारी शाळेतील मुलांच्‍या गुणवत्तेबाबत सवाल केले होते. यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. काही मुलं अभ्यासात कमकुवत राहिली तर आम्ही त्यांना अतिरिक्त वर्ग लावून शिकवू, यातील एक मुलगा भविष्यात देशाचा पंतप्रधान होणार आहे. बनावट पदवी घेऊन भविष्यात कोणीही पंतप्रधान होऊ नये, अशी आमची इच्छा आहे, असा आरोप त्‍यांनी केला होता. यावर आज नायब राज्‍यपालांनी केजरीवालांवर सडकून टीका केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news