शिक्षणाच्या मुद्यावरून केजरीवालांची पंतप्रधानांवर टीका

शिक्षणाच्या मुद्यावरून केजरीवालांची पंतप्रधानांवर टीका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत त्यांच्यावर टीका केली आहे.

आज (दि. ८) केजरीवाल यांनी ट्विट करीत पंतप्रधानांवर निशाणा साधला. ''मुलांच्या शिक्षणावर जेवढे पैसे खर्च करावे लागतील तेवढे खर्च करू.आम्ही आम्हच्या मुलांना चांगल्यातले चांगले शिक्षण देवू. भविष्यात याच मुलांपैकी कुणी देशाचे पंतप्रधान बनतील. भविष्यात कुठलाही अशिक्षित व्यक्ती देशाचा पंतप्रधान बनावा, अशी आमची इच्छा नाही'', अशा बोचऱ्या शब्दात केजरीवाल यांनी ट्विटरवरून अप्रत्यक्षरित्या पंतप्रधानांवर टीकास्त्र डागले.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर आम आदमी पक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने भाजप आणि पंतप्रधानांना लक्ष करीत आहेत. चांगल्या शाळा उभारत शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल करण्यात आल्यामुळे आम आदमी पक्षाच्या नेत्यांना लक्ष केले जात असल्याचा आरोप पक्षाकडून केला जात आहे.अशात पुन्हा एकदा केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय वातावरण आखणी तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news