लखनऊपासून अयोध्यापर्यंत मुख्यमंत्री शिंदे पिता-पुत्राची हवा | पुढारी

लखनऊपासून अयोध्यापर्यंत मुख्यमंत्री शिंदे पिता-पुत्राची हवा

अयोध्या : दिलीप शिंदे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटाचे मंत्री, आमदार आणि खासदार यांच्यासह रविवारी (दि.९) अयोध्यातील श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. त्यांच्या स्वागताचे होल्डिंग, बॅनर लखनऊ विमानतळापासून अयोध्यापर्यंत लागले आहेत. सर्वत्र मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेची भगवीमय हवा निर्माण झालेली दिसत आहे. ठाणे, नाशिकहून निघालेले सुमारे चार हजार शिवसैनिक आज (दि.८) सायंकाळी श्रीरामाच्या घोषणा देत अयोध्या नगरीत दाखल होतील.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्याला श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने त्यांचे जंगी स्वागत केले असून जणू काही मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्रातील मोठ्या शहरात आले आहेत, असे भगवेमय वातावरण बनविण्यात आले आहे.

चलो अयोध्या, असे फलक लागले असून त्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो प्रकर्षाने दिसून येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा हसरा चेहरा आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे एकमेकांकडे पाहत असतानाच फोटो उत्तर प्रदेशात चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे यांचीही आठवण अनेक लखनऊ आणि अयोध्यातील जुनी मंडळी काढताना दिसून येत आहे. एकंदरीत सर्वत्र भगवेमय वातावरणात मुख्यमंत्री शिंदे यांचीच चर्चा ऐकायला मिळत आहे.

हेही वाचा 

Back to top button