Vande Bharat Express | सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला पीएम नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा | पुढारी

Vande Bharat Express | सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला पीएम नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

पुढारी ऑनलाईन डेस्क :  सिकंदराबाद आणि तिरुपती दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही भारताची 12 वी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. हा सोहळा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या एक्स्प्रेसमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ जवळपास साडेतीन तासांनी कमी होईल. ही ट्रेन सिकंदराबाद आणि तिरुपती दरम्यानच्या शहरांमधून तिरुमला तिरुपती मंदिर येथे येणाऱ्या हजारो भाविकांसाठी वरदान ठरणार आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि शाळकरी मुलांशी संवाद साधला. (Vande Bharat Express)

Vande Bharat Express : जाणून घ्या सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेस बदद्ल 

सिकंदराबाद आणि तिरुपती दरम्यान जाणारी वंदे भारत एक्स्प्रेसला इतर ट्रेनप्रमाणे आठवड्यातून सहा दिवस धावेल. ती दोन तेलगु राज्यांना जोडेल. तर ही ट्रेन दोन्ही शहरांमधील 660 किलोमीटरचे अंतर 8 तास 30 मिनिटांत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

सिकंदराबाद ते तिरुपती स्थानकापर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 20701) साठी तिकिटाचा दर रु. 1680 आहे, ज्यामध्ये पर्यायी केटरिंग फीसाठी रु. 364,  एक्झिक्युटिव्ह क्लासमधील ट्रिपसाठी रु. 3080 समाविष्ट आहे, ज्यामध्ये केटरिंग फीसाठी रु. 419 समाविष्ट आहेत. त्याचबरोबर ट्रेन क्रमांक 20702 वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे चेअर कारमध्ये 1625 रुपये आणि केटरिंग चार्जेसमध्ये 308 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह कारमध्ये 3030 रुपये आणि केटरिंग चार्जेसमध्ये 369 रुपये असेल.

हेही वाचा 

Back to top button