IndiGo flight
IndiGo flight

IndiGo flight | इंडिगोच्या उडत्या विमानात इर्मजन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, मद्यधुंद प्रवाशाला अटक

Published on

बंगळूर, पुढारी ऑनलाईन : विमान प्रवासातील अनेक गैरप्रकार या दिवसात समोर आले आहेत. आता इंडिगोच्या विमानाने (IndiGo flight) दिल्लीहून बंगळूरला जाणाऱ्या कानपूरमधील ४० वर्षीय एका प्रवाशाला इर्मजन्सी एक्झिट मिड एअरचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. प्रतीक असे संशयित व्यक्तीचे नाव असून हा तो शुक्रवारी फ्लाइट क्रमांक 6E-308 ने प्रवास करत होता. तो 18-एफ आसनावर बसला होता. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

"या मद्यधुंद प्रवाशाने विमानात बसलेल्या इतर सहप्रवाशांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि इंडिगो एअरलाइन्स एक्झिटचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला," असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी विमानातील क्रू मेंबरच्या तक्रारीवरून आयपीसीच्या कलम २९० आणि ३३६ आणि एअरक्राफ्ट अॅक्टच्या ११ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकाराबद्दल इंडिगो एअरलाइन्सने माहिती दिली आहे. इंडिगोने जारी केलेल्या एका निवेदनात असेही म्हटले आहे की दिल्ली ते बंगळूर या फ्लाइट 6E 308 मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत इर्मजन्सी दरवाज्याचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यावर विमानातील क्रूने कॅप्टनला याची माहिती दिली आणि प्रवाशाला धोक्याची जाणीव करुन देण्यात आली. विमानाच्या प्रवासादरम्यान सुरक्षेची योग्य काळजी घेण्यात आली आणि विमान बंगळूरमध्ये पोहोचताच बेशिस्त प्रवाशाला 'सीआयएसएफ'च्या ताब्यात देण्यात आले," असे इंडिगोने म्हटले आहे. (IndiGo flight)

याआधी एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी शंकर मिश्रा याला अटक करण्यात आली होती. न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या विमानात मिश्रा याने हा किळसवाणा प्रकार केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात मिश्रा याने संबंधित किळसवाणा प्रकार केला होता. महिलेने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत दिल्ली पोलिसांनी ४ जानेवारी रोजी मिश्रा याला अटक केली होती.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news