Covid-19 updates | देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, २४ तासांत ४,४३५ नवे रुग्ण | पुढारी

Covid-19 updates | देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, २४ तासांत ४,४३५ नवे रुग्ण

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४,४३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या २३,०९१ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

याआधीच्या दिवशी देशात कोरोनाचे ३,०३८ नवे रुग्ण आढळून आले होते. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या २१,१७९ वर पोहोचली होती. तर २४ तासांत ९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिल्ली आणि पंजाबमध्ये प्रत्येकी २, जम्मू- काश्मीर, महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला होता. तर केरळमध्ये कोरोनाने दोघांचा बळी घेतला होता.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत वाढ

महाराष्ट्रात गेल्या एका दिवसात ७११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४७ रुग्ण कोरोनातून बरे झाले. एका दिवसात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा सामना करण्यासाठी राज्य पूर्णपणे सज्ज असल्याचे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्या राज्यातील एकही रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर नाही आणि वाढत्या रुग्णसंख्येला कारणीभूत असलेल्या व्हेरिएंटमुळे लोक गंभीर आजार होत नाहीत.

यवतमाळ जिल्ह्यात १० रुग्ण आढळले

यवतमाळ जिल्ह्यात १० रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या अनुषंगाने जिल्हास्तरिय टास्क फोर्स समिती परिस्थितिवर लक्ष ठेऊन असून नागरिकांनी त्रिसुत्रीचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जिल्ह्यात काल ४१९ कोविड चाचण्या केल्या असून त्यापैकी १० रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले तर ४०९ चाचण्या निगेटिव्ह आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ झाली आहे.

हे ही वाचा :

Back to top button