तो मी नव्‍हेच..! वय ६६, १० राज्‍यांत २७ लग्‍न! अखेर ओडिशातील ‘लखोबा लोखंडे’ ईडीच्‍या जाळ्यात | पुढारी

तो मी नव्‍हेच..! वय ६६, १० राज्‍यांत २७ लग्‍न! अखेर ओडिशातील 'लखोबा लोखंडे' ईडीच्‍या जाळ्यात

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ओडिशा राज्‍यातील महाठग अशी ओळख असणारा रमेश स्‍वेन याच्‍या आता सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) मुसक्‍या आवळल्‍या आहेत. ६६ वर्षांचा रमेश स्‍वेन याचा वावर १० राज्‍यांमध्‍ये होता. त्‍याने तब्‍बल २७ लग्‍न केली आहेत. धक्‍कादायक बाब म्‍हणजे या महाठगाच्‍या पत्‍नींमध्‍ये छत्तीसगढमधील चार्टर्ड अकाउंटंट, आसाममधीलडॉक्‍टर, ‘आयटीबीपी’ मध्‍ये कार्यरत असणार्‍या असिस्‍टंट कमांडंट, सर्वोच्‍च व उच्‍च न्‍यायालयातील दोन वकील आणि केरळ प्रशासनातील अधिकारी असणार्‍या महिलेचा समावेश आहे.
( Crime News Odisha )

आचार्य अत्रे यांच्‍या तो मी नव्‍हेच नाटकातील लखोबा लोखंडे पात्रसारखं जगणं वास्‍तावात जगलेला रमेश स्‍वेन याला मागील वर्षी ओडिशा पोलिसांनी अटक केली होती. दिल्लीत राहणाऱ्या त्‍याच्‍या पत्नीने मे २०२१ मध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. २०१८ मध्ये एका मॅट्रिमोनी साइटद्वारे तिची स्वेनशी भेट झाली. स्वेन यांनी आपण आरोग्य मंत्रालयात उपमहासंचालक असल्याचा दावा करत महिलेला आपल्‍या प्रेमाच्‍या जाळ्यात ओढले. यानंतर तिच्‍या लग्‍न केले होते. लग्‍नानंतर महिलेला लाखो रुपयांना गंडा घालून तो दिल्‍लीतून पसार झाला होता.

या प्रकरणी १३ फेब्रुवारी २०२२ रोजी स्‍वेन याच्‍याबरोबर त्‍याची सावत्र बहिण डॉ. कमला सेठी आणि चालकालाही पोलिसांनी आठ महिन्यांच्या शोधानंतर अटक केली होती. या कारवाईनंतर स्‍वेन याला ओडिशा उच्‍च न्‍यायालयाने जामीन मंजूर झाला होता.

Crime News Odisha : उच्‍चशिक्षित महिलांना ओढत असे जाळ्यात

स्वेनची भुवनेश्वरमध्ये किमान तीन भाड्याची घरे होती. लग्‍नानंतर तो पत्‍नीकडून पैसे उकळत असे. पैसे मिळाल्यानंतर तो पुढच्या पत्नीचा शोध घेत असे, अशी धक्‍कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्या पत्नींमध्ये आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट, छत्तीसगडचे चार्टर्ड अकाउंटंट, आसामचे डॉक्टर आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे दोन वकील आणि केरळ प्रशासनाच्या एका महिलेचा समावेश असल्‍याची माहितीही पोलिस तपासात उघड झाली होती.

आर्थिक फसवणूक प्रकरणी ईडीने घेतले ताब्‍यात

रमेश स्‍वेन याने १० राज्‍यांमध्‍ये २७ महिलांबरोबर लग्‍न आणि त्‍यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्‍याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. २००६ मध्‍ये त्‍याने केरळमधील १३ बॅकांना एक कोटी रुपयांची फसवणूक केली होती.यानंतर २०११ मध्‍ये हैदराबादमधील काहींना एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो असे सांगून त्‍याने २ कोटी रुपये लाटले होते. या प्रकरणी ईडीने त्‍याला अटक केली असून, आता त्‍याच्‍या कोठडीची मागणी करणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button