Swati And Dayashankar Singh Divorce : उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री-माजी मंत्र्यांचा घटस्फोट; २२ वर्षांचा संसार मोडला | पुढारी

Swati And Dayashankar Singh Divorce : उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री-माजी मंत्र्यांचा घटस्फोट; २२ वर्षांचा संसार मोडला

लखनौ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री दयाशंकर सिंह व त्यांच्या पत्नी तसेच माजी मंत्री स्वाती सिंह यांचा 22 वर्षांचा संसार अखेर मोडला आहे. लखनौ कौटुंबिक न्यायालयाने दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. स्वाती सिंह यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दयाशंकर सिंह सुनावणीला उपस्थितच राहिले नाहीत. (Swati And Dayashankar Singh Divorce)

दयाशंकर सिंह व स्वाती सिंह यांच्यात यापूर्वी 2012 मध्येही वाद झाला होता. न्यायालयातही हा वाद गेला. तेव्हाही स्वाती सिंह यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र 2017 मध्ये स्वाती सिंह या मंत्री बनल्यामुळे खटल्याकडे दुर्लक्ष झाले. पुढे 2018 मध्ये ही केस बंद करण्यात आली होती. (Swati And Dayashankar Singh Divorce)

घटस्फोटाचे कारण काय?  (Swati And Dayashankar Singh Divorce)

स्वाती सिंहही यापूर्वीच्या योगी सरकारमध्ये मंत्री होत्या. दयाशंकर यावेळेच्या योगी सरकारमध्ये आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पती-पत्नींच्या संबंधांत वितुष्ट आले होते. पती-पत्नी दोघांना भाजपचा सुरक्षित मतदार संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरोजिनीनगर या एकाच मतदार संघातून उमेदवारी हवी होती. पती-पत्नी संघर्षात पत्नी स्वाती सिंह यांचे तिकीट कापले गेलेच, पण सरोजिनीनगरातून नव्हे तर बलियातून पती दयाशंकर सिंह यांना भाजपची उमेदवारी मिळाली होती. दोघांचा प्रेमविवाह होता. लखनौ विद्यापीठात शिकत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मध्यंतरी पतीसाठी स्वाती सिंह या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांच्याशीही भिडल्या होत्या.

दयाशंकर यांच्या नावातच दया आहे. ते एक अत्यंत वाईट पती होते. अनेकदा त्यांनी मला मारझोडही केली. संसार मोडू नये म्हणून मी खूप सहन केले. अखेर गोष्ट पलीकडे गेली.
– स्वाती सिंह

हा एकतर्फी घटस्फोट आहे. मी अर्ज केला नाही की, कोर्टातही गेलो नाही, पण मला या विषयात पुढे जायचे नाही. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे नको ते घडले आहे.
– दयाशंकर सिह

अधिक वाचा :

Back to top button