Premanand Maharaj: विराट कोहलीला आश्रमात आणण्यासाठी 5 कोटी दिले? प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा

Premanand Maharaj Ashram Controversy: बिल्डर आणि कथित भू-माफिया गटाने प्रसिद्धीसाठी विराट कोहलीला प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात आणण्यासाठी 5 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात आला आहे.
Premanand Maharaj Ashram Virat Kohli Controversy
Premanand Maharaj Ashram Virat Kohli ControversyPudhari
Published on: 
Updated on: 

Premanand Maharaj Ashram Controversy: वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराज यांच्या ‘हित राधा केली कुंज’ आश्रमाभोवतीचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. आश्रमातील शिष्य रसिक दुलारी यांच्या रहस्यमय मृत्यूनंतर आता आश्रमाशी संबंधित अनेक गंभीर दावे समोर येत आहेत. त्यात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या आश्रम भेटीबाबत करण्यात आलेल्या एका दाव्यानेही खळबळ उडाली आहे.

श्री कृष्णा न्यास संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश शर्मा फलाहारी यांनी दावा केला आहे की, बिल्डर लॉबी आणि भू-माफिया गटाने स्वतःच्या फायद्यासाठी विराट कोहलीला पहिल्यांदा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात आणण्यासाठी 5 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

विराट कोहलीच्या आश्रम भेटीमागे 5 कोटींचा दावा

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 4 जानेवारी 2023 रोजी वृंदावनला जाऊन प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले होते. त्यानंतरही दोघे अनेकदा महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आश्रमात गेले आहेत.

आता त्यांच्या पहिल्या भेटीबाबत दिनेश शर्मा फलाहारी यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आश्रमाशी संबंधित एका गटाने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि आर्थिक फायद्यासाठी विराट कोहलीला आश्रमात आणण्यासाठी 5 कोटी रुपये दिले.

Premanand Maharaj Ashram Virat Kohli Controversy
Aadhaar Card: आधार कार्डवरील नाव बदलण्याचे नवे नियम लागू; लग्नानंतर आडनाव बदलण्यापासून स्पेलिंग दुरुस्तीपर्यंतची प्रक्रिया जाणून घ्या

याच पैशांची नंतर वसुली करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, या आरोपांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

या पार्श्वभूमीवर दिनेश शर्मा फलाहारी आणि महामंडलेश्वर श्री राधा नंदगिरी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवले आहे. प्रेमानंद महाराजांच्या सुरक्षेबाबत या पत्रातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. महाराजांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत त्यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

रसिक दुलारी यांच्या मृत्यूमुळे प्रश्न

या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आश्रमातील शिष्य रसिक दुलारी यांच्या मृत्यूचे प्रकरण आहे. 25 सप्टेंबर रोजी त्यांचा छतावरून खाली पडतानाचा CCTV व्हिडिओ समोर आला होता. सुरुवातीला या घटनेकडे आत्महत्येच्या दृष्टीने पाहिले जात होते.

मात्र, पोस्टमार्टम अहवालातील माहिती समोर आल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर आहे असं समजलं. अहवालानुसार, खाली उडी मारण्यापूर्वी त्यांनी ग्राइंडर मशीनचा वापर करून स्वतःला गंभीर दुखापत केली होती. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत 85 जणांचे जबाब नोंदवले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Premanand Maharaj Ashram Virat Kohli Controversy
IndiGo Fuel Charge: इंडिगोकडून प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटांचे दर एक ते दहा हजारांनी वाढणार, आज मध्यरात्रीपासून नवे दर

तरुण बेपत्ता झाल्याचेही आरोप

आश्रमावर केवळ आर्थिक गैरव्यवहार आणि मृत्यूशी संबंधित आरोप होत नाहीत, तर काही तरुण बेपत्ता झाल्याचे दावेही समोर आले आहेत. मेरठचे रहिवासी नेत्रपाल आपल्या मुलाचा प्रिन्सचा फोटो घेऊन आश्रमाबाहेर त्याचा शोध घेत होते. प्रिन्स 8 मे 2024 रोजी दर्शनासाठी आश्रमात आला होता. त्यानंतर तो घरी परतला नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांकडून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, यापूर्वी बेपत्ता झालेल्या एका युवकाला पोलिसांनी बरसाना येथून शोधून काढले होते. त्यामुळे आश्रमाशी संबंधित बेपत्ता होण्याच्या प्रकरणांमुळेही भक्तांमध्ये चिंता वाढली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव प्रेमानंद महाराज दुसऱ्या आश्रमात?

या सर्व आरोपांदरम्यान प्रेमानंद महाराजांना सुरक्षेच्या कारणास्तव ‘हित राधा केली कुंज’ येथून दुसऱ्या गुप्त ठिकाणी हलवण्यात आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, आश्रमाशी संबंधित आरोपांची चौकशी सुरू आहे. विराट कोहलीला आश्रमात आणण्यासाठी दिलेले 5 कोटी रुपये, रसिक दुलारी मृत्यू प्रकरण आणि भू-माफिया किंवा बिल्डर लॉबीशी संबंधित आरोप यांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणातील अनेक दावे सध्या आरोपांच्या स्वरूपात आहेत. त्यांची अधिकृत किंवा स्वतंत्र पुष्टी केलेली नाही. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत या दाव्यांकडे आरोप म्हणूनच पाहणे योग्य ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news