covid : दहा सेकंदांत कोव्हिड आहे की साधा फ्लू सांगणारे उपकरण

covid : दहा सेकंदांत कोव्हिड आहे की साधा फ्लू सांगणारे उपकरण

न्यूयॉर्क : सध्या 'कोव्हिड-19' आणि 'एच 3 एन 2' इन्फ्लुएंझाचे संक्रमण वेगाने वाढत आहेत. इन्फ्लुएंझा किंवा फ्लूला सर्वसाधारणपणे हलकी लक्षणे असलेल्या संक्रमणाच्या रूपात पाहिले जात असते; पण 'एच 3 एन 2' व्हेरिएंटमुळे लोकांमध्ये गंभीर आजाराचा धोकाही निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच कोरोनाच्या 'एक्सबीबी.1.16' सब-व्हेरिएंटची अधिक संक्रामकता आणि रोगप्रतिकारक क्षमतेवर मात करणारी क्षमता दिसलेली आहे. लस घेतलेल्या लोकांमध्येही त्याच्या संक्रमणाचा धोका संभवतो. दोन्ही संक्रमणांची लक्षणे जवळजवळ सारखीच असल्याने रुग्णाला नेमके फ्लूचे संक्रमण आहे की कोरोनाचे हे समजत नाही. आता संशोधकांनी एक असे सेन्सर विकसित केले आहे ज्याच्या सहाय्याने केवळ दहा सेकंदांमध्येच 'कोव्हिड' आहे की 'फ्लू' हे समजू शकते!

वैज्ञानिकांनी म्हटले आहे की सिंगल-अ‍ॅटम-थिक नॅनोमटेरियलपासून बनलेल्या या सेन्सरच्या माध्यमातून दोन्ही प्रकारच्या विषाणूंचा छडा लागू शकतो. पारंपरिक तपासणीच्या प्रक्रियेच्या तुलनेत यामुळे अधिक वेगाने निष्कर्ष मिळू शकतात. या सेन्सर आधारित संशोधनाची माहिती अमेरिकन केमिकल सोसायटीच्या बैठकीत सादर केली जाणार आहे. या संशोधनाला वैश्विक मान्यता मिळाल्यास दोन्ही प्रकारच्या संक्रमणाचा छडा लावणे सोपे जाणार आहे.

डॉ. डेजी अकिनवांडे हे बैठकीत अशा प्रकारचे सेन्सर सादर करतील. त्यांनी सांगितले की फ्लू आणि 'कोव्हिड-19'ची लक्षणे बर्‍याच अंशी एकमेकांसारखीच असतात. त्यांच्यामधील फरक लक्षात घेणे कठीण होऊन बसते. हे दोन्ही विषाणू एकाच वेळी फैलावत असल्याने आता अशा सेन्सरची आवश्यकता निर्माण झाली आहे जो एकाच वेळी हे दाखवेल की आपल्याला 'कोव्हिड-19' आहे की फ्लू. यापैकी दोन्हीही नाही किंवा दोन्हीही आहे हे सुद्धा ते दाखवू शकेल. या सेन्सरमध्ये हेक्झागोनल पॅटर्नमध्ये कार्बन अणूंच्या एका स्तराचा (ग्राफिन) वापर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news