Rain Forecast: राज्यातील ‘या’ भागांत विजांच्या गडगडाटांसह पावसाची शक्यता | पुढारी

Rain Forecast: राज्यातील 'या' भागांत विजांच्या गडगडाटांसह पावसाची शक्यता

पुढारी ऑनलाईन : वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव वायव्य भारतासह देशातील अनेक भागात जाणवत आहे. राज्यात उत्तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील आज याचा प्रभाव दिसून येत आहे. पुणे, रायगड, नाशिक, सातारा, ठाणे, उत्तर विदर्भ, धुळे, जळगांवमध्ये ढगाळ वातावरण असून, मेघगर्जनेसह विजांच्या गडगडाटांसह आज पाऊस पडणावर असल्याची माहिती IMD पुणेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.

पूर्व मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर राजस्थानचा काही भाग आणि आजूबाजूच्या परिसरात देखील मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर वायव्य, पूर्व आणि दक्षिण भारतातील काही भागांवर याचा परिणाम होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील हवामान बदलाचा परिणाम जाणवत आहे. दरम्यान गुजरात, दक्षिण भारताची किनारपट्टी आणि विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या भागातील तापमानात किंचितशी वाढ होणार आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे भारतील अनेक राज्यांना अवकाळीचा फटका बसत आहे. येत्या 2 दिवसांत, पश्चिम हिमालय क्षेत्रासह संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात पाऊस, वादळ आणि गारपिटीची शक्यता आहे. ३१ मार्चपर्यंत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पूर्व-पश्चिम राजस्थान आणि उत्तर प्रदेशात गारपीट होणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button