Man Fires At Colleague : ऑफिसमधील खुर्चीच्या भांडणातून कर्मचार्‍यावर सहकार्‍याकडून गोळीबार

Man Fires At Colleague : ऑफिसमधील खुर्चीच्या भांडणातून कर्मचार्‍यावर सहकार्‍याकडून गोळीबार
Published on
Updated on

गुरूग्राम; वृत्तसंस्था : एका वित्त कंपनीत खुर्ची पळवण्याच्या वादातून एका कर्मचार्‍याने दुसर्‍यावर चक्क गोळी झाडल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी घडला. यात एकजण जखमी झाला असून, गोळी झाडणारा फरार झाला आहे. (Man Fires At Colleague)

जखमी कर्मचार्‍याचे नाव विशाल असून, अमन जांगडा असे गोळीबार करणार्‍याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी कार्यालयात अमन आणि विशाल यांच्यात खुर्ची पळवण्याच्या प्रकारावरून भांडण झाले होते. बुुधवारीही सकाळी थोडा वाद झाला. कार्यालय संपल्यावर त्या दोघांत पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर विशाल कार्यालयातून बाहेर पडला. मिनिटभरातच अमन पाठीमागून आला आणि हातातील पिस्तूलमधून त्याने विशालवर दोन गोळ्या झाडल्या. विशाल खाली पडल्यानंतर अमन पळून गेला. जखमी विशालला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, फरार अमनचा शोध सुरू आहे. (Man Fires At Colleague)

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news