नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय सैन्य भरती कोरोना महामारीचा प्रसार वाढू नये यासाठी स्थगित केली आहे. कोरोनाचा प्रसार थांबला आहे, पण कोरोना अजून संपलेला नाही. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी युवक मोठ्या संख्येने येत असतात. यामुळेच मोठ्या भरतीचे नियोजन थांबवण्यात आले आहे. सरकारने भरती बंद केलेली नाही, असे केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री अजय भट्ट म्हणाले आहेत.
केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री अजय भट्ट यांनी राजस्थानचे खासदार हनुमान बेनीवाल यांच्या प्रश्नाला हे लिखित उत्तर दिले आहे. अजय भट्ट म्हणाले आहेत की, कोरोनामुळे राजस्थान बरोबरचं संपुर्ण देशात सैन्य भरती जोन ऑफिसने पुढील आदेशापर्यंत थांबवली. संरक्षम राज्यमंत्री अजय भट्ट यांनी प्रश्नाल लिखित उत्तरामध्ये म्हटले आहे की, २०२० मध्ये कोरोना महामारीची सुरुवात झाली. त्यानंतर २०२०-२१ या वर्षांमध्ये सैन्य भरती झाली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्याकडून सशस्त्र दलात महिलांच्या भरतीवर प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना अजय भट्ट यांनी उत्तर दिले आहे की, महिलांच्या भरतीबाबत नियमांचे पालन केले जात आहे. इतर मुद्यांवरही विचार केला जाईल.